Home /News /crime /

Shocking! 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण जाणून बसेल धक्का

Shocking! 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण जाणून बसेल धक्का

तिने आपल्या आईच्या मृत्यूनंतर कोणालाही याची माहिती होऊ दिली नाही. तिने आईवर अंत्यसंस्कारही केले नाहीत आणि घरामध्येच आईचा मृतदेह सडत ठेवला

    नवी दिल्ली 07 डिसेंबर : आई आपल्या मुलांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असते आणि शेवटपर्यंत ती आपल्या मुलांची काळजी घेते. आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कार करणं हे मुलांचं कर्तव्य असतं. मात्र, अमेरिकेतील एका महिलेनं केलेलं कृत्य वाचून तुम्हीही हादराल. आपल्या आईच्या निधनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करणं तर दूरच मात्र या महिलेनं अनेक महिने आपल्या आईचा मृतदेह घरामध्ये सडत ठेवला (Woman Lived with Mother’s Dead Body for 6 Months). यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हेही वाचा - 4 गर्लफ्रेंडच्या प्रेमात आंधळा झाला तरूण; आजीचाच कापला गळा, धक्कादायक खुलासा न्यू हँपशायरमध्ये (New Hampshire) राहणाऱ्या 54 वर्षीय किम्बर्ले हेलर हिने आपल्या आईच्या मृत्यूनंतर आईचा मृतदेह तब्बल सहा महिने घरामध्येच ठेवला (Daughter Lived with Mother’s Dead Body). याच कारण कोणताही मानसिक आजार किंवा तिचं आईप्रती असलेलं प्रेम नव्हतं तर स्वतःच्या स्वार्थासाठी तिने हे सर्व केलं होतं. महिलेनं केवळ यासाठी आपल्या आईला नीट अखेरचा निरोप दिला नाही, जेणेकरून आईच्या मृतदेहापासूनही तिला फायदे मिळतील. किम्बर्ले हेलर हिच्यावर आरोप आहे की तिने आपल्या आईच्या मृत्यूनंतर कोणालाही याची माहिती होऊ दिली नाही. तिने आईवर अंत्यसंस्कारही केले नाहीत आणि घरामध्येच आईचा मृतदेह सडत ठेवला. बेडफोर्ड पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हेलरच्या आईचा मृत्यू मे महिन्यात झाला होता.18 नोव्हेंबरला हेलरला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तेव्हापर्यंत या 54 वर्षीय महिलेनं आपल्या आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि ती कोणालाही आपल्या घरामध्ये येऊ देत नव्हती. हेही वाचा - विवाहित उद्योजिकेला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; अश्लील VIDEO बनवून लाखोंची वसुली बरेच दिवस हेलरची आई न दिसल्याने लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी हेलरच्या घरी जात तिच्या घरातून सडलेला मृतदेह ताब्यात घेतला. ऑटोप्सीमध्ये समजलं की महिलेचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता मात्र तिच्यापासून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे मुलीने मृत्यूची माहिती सार्वजनिक केली नाही. महिलेचं सोसायटी सिक्योरिटी पेमेंट मृत्यूनंतरही मिळत होतं. याचा वापर महिलेची मुलगी करत होती. आता या मुलीवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. े
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Dead body

    पुढील बातम्या