कुशीनगर, 27 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन (Lockdown)सुरू आहे. दरम्यान, शनिवारी हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका तरुणीवर तिच्या आईची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीने धारदार शस्त्राने गळा चिरुन आईची हत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचवेळी, हत्येनंतर मुलगी पळून गेली आणि शेजारच्या घरात लपली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गळा कापल्यानंतर आई आपल्या मुलाच्या खोलीत गेली बेशुद्ध होऊन खाली कोसळली. कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. असा विश्वास आहे की, आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या मुलीने हे भयानक पाऊल उचललं. सध्या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
POSITIVE NEWS : लस...ड्रोन आणि रोबो, तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारतात प्रयत्न
कुशीनगर जिल्ह्यातील खाडा पोलीस स्टेशन परिसरातील पिपरिया टोला इथं हा भयानक प्रकार घडला आहे. मुन्ना पटेल हा पत्नी विद्यावती, मुलगी संध्या आणि दोन मुलांसमवेत राहते. शनिवारी आरोपी मुलगी आई विद्यावतीबरोबर त्याच पलंगावर झोपली होती. रात्री उशीरा मुलीने आईच्या गळ्यावर वार केले. आईचा गळा कापल्यानंतर संध्या घरातून पळाली. दरम्यान, घरातील इतर लोक जागे झाले. लोकांनी पाहिले तेव्हा विद्यावती जमिनीवर पडल्या. तिला तुर्खा सीएचसी इथं नेण्यात आलं, तिथं डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.
नागपूर हादरलं! लेकानेच वडिलांचं कापलं गुप्तांग, बोलत होता हिंदी सिनेमातले डायलॉग
यानंतर लोकांनी संध्याचा शोध सुरू केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी संध्याला बेशुद्ध अवस्थेत शेजारच्या घरातून ताब्यात घेतलं. संध्याची प्रकृती पाहून पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. आईची हत्या करणाऱ्या संध्यानं सांगितलं की, तिने शेजारच्या दुसर्या मुलीच्या सांगण्यावरून तिच्या आईची हत्या केली.
Coronavirus: कोरोनाच्या वॅक्सिनसाठी संपूर्ण जगाला भारताकडून आशा, कारण...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.