• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • काठीनं डोकं फोडलं; बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या नराधम बापाचा मुलीनं केला खून

काठीनं डोकं फोडलं; बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या नराधम बापाचा मुलीनं केला खून

हे प्रकरण जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाणे परिसरातील बिरामी गावातील आहे. या मृत नराधम वडिलाला दारुचे व्यसन होते. मद्यधुंद स्थितीत घरी परतल्यानंतर त्यानं आपल्याच मुलीला वासनेचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला

 • Share this:
  जोधपूर, 19 मे: राजस्थानच्या जोधपूरमध्ये (jodhpur rajasthan) मुलीनेच स्वत:च्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. वैद्यकीय विभागाकडून शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हे प्रकरण जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाणे परिसरातील बिरामी गावातील आहे. या मृत नराधम वडिलाला दारुचे व्यसन होते. मद्यधुंद स्थितीत घरी परतल्यानंतर त्यानं आपल्याच मुलीला वासनेचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीनं केला आहे. नात्याला काळिमा फासणारा नराधम वडील नेहमीच आपल्या मुलीला मद्यपान करून त्रास देत असे. सोमवारी रात्री तर त्यानं सर्व मर्यादा ओलांडत मुलीचे कपडे फाडत तिच्यावर शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं मुलीनं आपला बचाव करत असताना, हातात सापडलेल्या काठीनं थेट डोक्यावर वार केल्यानं तो निपचित जमिनीवर पडला आणि रक्तस्त्राव होऊ लागला. याप्रकारानं घाबरलेली मुलगी आपल्या आईजवळ परत जावून झोपली आणि सकाळी उठल्यानंतर पाहिले असता वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मथुरादास माथूर रूग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. डीसीपी धर्मेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे वय अंदाजे 40 वर्षे होते आणि त्याला दारुचे व्यसन होते. अलीकडेच तो गुजरातहून त्याच्या गावी परतला होता. चौकशीदरम्यान घरातील इतर सदस्यांनी सांगितले की, तो भांडणखोर स्वभावाचा होता आणि त्याचा पत्नीबरोबर नेहमी वाद होत असायचा. यापूर्वीही त्याने आपल्या मुलीशी गैरवर्तन केले होते. मात्र, घरातील लोकांनी लाजेखातर याबाबत बाहेर कोठेही वाच्यता केली नव्हती. याशिवाय त्यानं पत्नीला एकदा जाळण्याचाही प्रयत्नही केला होता. सोमवारी मध्यरात्री या नराधम बापानं सगळ्या मर्यादा ओलांडत मुलीचे कपडे फाडत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतप्त मुलीनं रागाच्याभरात केलेल्या प्रहारानं त्याला प्राणाला मुकावं लागलं. ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री मृतकाच्या मुलीशिवाय आई घरी होती. दोन अल्पवयीन मुले शेजारच्या आजीच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. आई आणि मुलगी दुसर्‍या खोलीत झोपली होती. रात्री तो कुठून तरी बाहेरून घरी परत आला आणि मुलीकडे पिण्यासाठी पाणी मागू लागला. पाणी घेऊन आलेल्या मुलीशी त्यानं लगेच लगट करत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीनं त्याची हत्या केली.
  Published by:News18 Desk
  First published: