Home /News /crime /

सासू करत होती देवपूजा, छळाला कंटाळलेल्या सूनेने डोक्यात घातला रॉड आणि...

सासू करत होती देवपूजा, छळाला कंटाळलेल्या सूनेने डोक्यात घातला रॉड आणि...

सासूची हत्या केल्यानंतर छायाने मतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत भरला आणि मोकळ्या प्लॉटमध्ये टाकून दिला होता.

  नाशिक 13 फेब्रुवारी : सासूच्या सततच्या छळाला कंटाळून सुनेने सासूचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तब्बल 10 दिवसांनी हा खुनाचा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी सुने विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय. गेल्या 10 दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. नंतर त्यांचा मृतदेह एका मोकळ्या जागेत आढळून आला होता. त्यानंतर या सगळ्या घटनेचा खुलासा झाला. मंदाकिनी पाटील असं मृत झालेल्या सासूचं नाव आहे. तर छाया असं त्यांच्या सूनेचं नाव आहे. मंदाकिनी यांचा लहान मुलगा सचिन यांच्याशी तीचं लग्न झालं होतं. सचिनचं हे दुसरं लग्न होतं. लग्न झाल्यापासूनच मंदाकिनी आणि छायाचं कधीच फारसं पटलं नाही. त्या छायाला कायम घालून पाडून बोलत होत्या असा आरोप केला जातो. या सततच्या त्रासाला सून छाया या कंटाळल्या होत्या. मंदाकिनी या एक दिवस नेहमीप्रमाणे घरात देवपूजा करत होत्या. त्या दिवशी घरात कुणीच नाही याची खात्री झाल्यावर छाया यांनी पूजेसाठी बसलेल्या सासूच्या डोक्यावर लोखंडी रॉडचे वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर छायाने सासूचा मृतदेह पोत्यात टाकून एका मोकळ्या प्लॉटमध्ये फेकून दिला. नंतर पोलीस तपास करत असताना त्यांना छायावर संशय आला आणि त्यातच तिने आपणच खून केल्याचं कबूल केलं.

  सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

  सासूची हत्या केल्यानंतर छायाने मतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत भरला आणि मोकळ्या प्लॉटमध्ये टाकून दिला होता. काही दिवसानंतर त्याची दुर्गंधी यायला लागली. त्यांच्या अंगावर दागिणेही होते. त्यामुळे चोरीतून ही हत्या झाली नसावी याची पोलिसांना खात्री पटली आणि माग काढत ते छायापर्यंत पोहोचले. हेही वाचा... मला गोळ्या घालून मारून टाका, हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपीची प्रतिक्रिया

  खेळताना 2 वर्षांचा संस्कार पडला 10 फुट खोल नाल्यात, 12 तासानंतरही शोध सुरूच

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  पुढील बातम्या