मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सूनेने गुन्हा दाखल केल्याने सासरा 80 फूट उंच झाडावर चढला; 10 तासानंतर खाली उतरवण्यात यश

सूनेने गुन्हा दाखल केल्याने सासरा 80 फूट उंच झाडावर चढला; 10 तासानंतर खाली उतरवण्यात यश

सूनेने (daughter in law) पोलिसांत तक्रार (Lodged complaint) दिली म्हणून सासरा (father in law) थेट गावातील एका उंच झाडावर (Climbed on tree) चढला आहे.

  • Published by:  News18 Desk
सागर, 24 जानेवारी: आपल्या देशात कधी काय घडेल, हे कोणी सांगू शकत नाही. अशीच एक विचित्र घटना सध्या समोर आली आहे. या घटनेतील सासऱ्याला कौटुंबिक वादामुळे तब्बल 10  तास झाडावर चढून बसावं लागलं आहे. संबंधित सासऱ्याच्या विरोधात सूनेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी न्यायालयात सुनावणी होणार होती. तत्पूर्वी सासरा गावातील एका 80 फुट उंच असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर जावून बसला. तब्बल दहा तास अथक प्रयत्न केल्यांनतर सासऱ्याला झाडावरून उतरवण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे. ही घटना मालथौन पोलीस स्टेशन परिसरातील हिन्नौद या गावातील आहे. येथील एक शेतकरी तब्बल 80 फूट उंच असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर जावून बसला होता. त्याने सुमारे 10 तास पोलीस, प्रशासन आणि गावातील लोकांचा वेळ वाया घालवला आहे. बर्‍यापैकी प्रयत्न केल्यानंतर त्याला खाली उतरवण्यात यश आलं आहे. संबंधित व्यक्तीविरोधात सूनने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी शनिवारी न्यायालयात चलन दाखल करण्यात येणार होतं. पण तत्पूर्वी सासरा मोठ्या सूनेची समजूत घालण्यासाठी गावातील एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर चढला. ही घटना शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. या संबंधित घटनेची माहिती देताना गावचे सरपंच पंचमसिंह यांनी सांगितलं की, सहा महिन्यांपूर्वी शेतकरी उत्तमचं आपल्या मोठ्या सूनेसोबत काही कौटुंबिक कारणास्तव भांडण झालं होतं. यानंतर सूनेने आपल्या सासऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मालथौनचे तहसीलदार सतीश वर्मा यांनी सांगितलं की, हा शेतकर्‍याचा कौटुंबिक वाद आहे.  संबंधित शेतकऱ्याने आपल्या सूनेला मारहाण केल्याचा आरोप या शेतकऱ्यावर आहे. या घरगुती वादातून शेतकऱ्याने केलेल्या या कृत्यामुळे पोलीस, प्रशासन आणि गावकऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.
First published:

Tags: Madhya pradesh

पुढील बातम्या