मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचं घर पेटवलं; दापोलीतील घटना

लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचं घर पेटवलं; दापोलीतील घटना

लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचं घर पेटवलं

लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचं घर पेटवलं

लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचे घर पेटवून दिल्याची घटना दापोली तालुक्यातील कोळथरे गावात घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

शिवाजी गोरे, दापोली

रत्नागिरी, 7 फेब्रुवारी : महाडमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच शेजारच्या रत्नागिरीत लग्नास नकार दिल्याने चक्क मुलीच्या वडिलांचे घर पेटवून दिलं आहे. ही घटना दापोली तालुक्यातील कोळथरे गावात घडली. यामध्ये पीडित आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तरुणाच्या विरोधात दाभोळ सागरी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

या आगीत अंजुम मुकादम यांचे घर जळून खाक झाले आहे. या प्रकरणी नातेवाईक असलेल्या तरुणावर संशय व्यक्त केला जात आहे. मुकादम यांचा नातेवाईक असलेल्या तरुणासोबत मुलीचे लग्न काही दिवसापूर्वी जुळल्याचे प्रथम दर्शनी बोलले जात आहे. मात्र, मुकादम यांनी आपली सदर तरुणाला देण्यास नकार दिला होता. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये गेले काही दिवस मतभेद सुरू असल्याचे बोलले जात आहे. काल सोमवारी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. लग्नास नकार दिल्याने त्याचाच राग येऊन तरुणाने घराला आग लावल्याचे बोलले जात आहे. दाभोळ सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, उशिरापर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झाली नव्हती.

वाचा - दिराने लाज सोडली, वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ केला रेकॉर्ड अन्... बीडमधील घटना

प्रेमास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या

एकतर्फी प्रेम प्रकरणातुन 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तीने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेटस ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडुन सांगण्यात येत आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime, Marriage