मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

न्यायासाठी लढणाऱ्यांसोबतच धोका; पदवी नसतानाही केली वकिली; बिंग फुटल्यानंतर महिला फरार

न्यायासाठी लढणाऱ्यांसोबतच धोका; पदवी नसतानाही केली वकिली; बिंग फुटल्यानंतर महिला फरार

महिला गेल्या दोन वर्षांपासून वकील (Advocate) म्हणून प्रॅक्टिस (Practice) करत होती. ही महिला बार असोसिएशनच्या (Bar Association) निवडणुकीला उभी राहिली आणि निवडूनदेखील आली.

महिला गेल्या दोन वर्षांपासून वकील (Advocate) म्हणून प्रॅक्टिस (Practice) करत होती. ही महिला बार असोसिएशनच्या (Bar Association) निवडणुकीला उभी राहिली आणि निवडूनदेखील आली.

महिला गेल्या दोन वर्षांपासून वकील (Advocate) म्हणून प्रॅक्टिस (Practice) करत होती. ही महिला बार असोसिएशनच्या (Bar Association) निवडणुकीला उभी राहिली आणि निवडूनदेखील आली.

तिरुअनंतपुरम, 24 जुलै : केरळमध्ये एक महिला गेल्या दोन वर्षांपासून वकील (Advocate) म्हणून प्रॅक्टिस (Practice) करत होती. ही महिला बार असोसिएशनच्या (Bar Association) निवडणुकीला उभी राहिली आणि निवडूनदेखील आली. अनेक खटलेही तिने लढवले होते; मात्र ही महिला बनावट वकील (Fake Advocate) असून, तिने कायद्याची पदवी मिळवलेली नसल्याचं अचानक पुढे आलं आहे. या बनावट महिला वकिलाच्या कारनाम्यांमुळे केरळमध्ये (Kerala) एकच खळबळ उडाली असल्याचं 'लाइव्ह लॉ डॉट इन'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

सेसी झेवियर (Sesi Xavier) असं या महिलेचं नाव आहे. एलएलबीची पदवी नसताना आणि राज्य बार कौन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ ती केरळमधल्या अलप्पुझा (अलेप्पी) येथे वकिलीची प्रॅक्टिस करत होती. याबाबतची माहिती बार असोसिएशनला निनावी पत्राद्वारे (Unknown Letter) समजली आणि हे प्रकरण उघडकीला आलं. विशेष म्हणजे बार असोसिएशनमध्ये ग्रंथपाल (Librarian) म्हणून काम करताना पदाचा दुरुपयोग करून सेसी झेविअरने अनेक महत्त्वाची पुस्तकं आणि दस्तऐवज चोरुन नेल्याचं बार असोसिएशनने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर आपल्याला जामीन (Bail) मिळेल या विचाराने सेसी झेविअरने शरण येणार असल्याचं घोषित केलं; मात्र मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अनेक नाट्यमय घटना घडल्या. पोलिसांनी एफआयआरमध्ये अजामीनपात्र गुन्ह्याचा समावेश केल्याचे समजताच ती न्यायालयाच्या परिसरातून फरार झाली असून, पोलिसांना अद्याप तिचा शोध लागलेला नाही. लाइव लॉ इनने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-VIDEO : चालता चालता मंत्री पायऱ्यांवरुन पडले; गेटवरील महिला अधिकारीलाच फटकारलं

कायद्याची पदवी आणि राज्य बार कौन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने सेसी अलेप्पी येथील एका प्रतिष्ठित वकिलाच्या कार्यालयात कनिष्ठ वकिल म्हणून काम करत होती. त्याआधी तिने काही महिने या वकिलासोबत इंटर्नशिप केली. कायदा शाखेच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थीनी असल्याचं ती सांगत असे. प्रॅक्टिसच्या दरम्यान न्यायालयात काही केसेसमध्ये तिने सहभागही घेतला होता. काही केसेससाठी तिची अधिवक्ता आयुक्त म्हणूनही नेमणूक झाली होती. बार कौन्सिलमध्ये नाव नोंदवण्यासाठी झेविअरने मार्च 2019मध्ये अलेप्पी बार असोसिएशनमध्ये सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर यंदा सेसीने बार असोसिएशनची निवडणूक लढवली होती आणि 15 जुलै 2021 रोजी तिची ग्रंथपाल म्हणून निवड झाली होती.

सेसीची अशी वाटचाल सुरू असताना बार असोसिएशनला एक निनावी पत्र मिळालं आणि ते वाचून सर्वांनाच धक्का बसला. त्यात सेसीकडे एलएलबीची पदवी आणि नोंदणीपत्र नसल्याचं म्हटलं होतं. याबाबत बार असोसिएशनने केरळ बार असोसिएशनकडे चौकशी केली. सेसी झेविअरने दिलेला नोंदणी क्रमांक तिरुअनंतपुरममध्ये सराव करणाऱ्या दुसऱ्याच वकिलाचा असल्याचं त्यातून स्पष्ट झालं. त्यानंतर सेसी झेविअरवर कारवाई करण्यात आली. असोसिएशनने तिचं सदस्यत्व रद्द करण्यासोबतच ही बाब जिल्हा न्यायाधीशांना कळवली. असोसिएशनने दिलेल्या नोटिशीला सेसीने अद्याप उत्तर दिलेलं नसून, ती फरार झाली आहे.

First published:

Tags: Kerala, Law, Money fraud