मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

विकृतीचा कळस! रात्री 2 वाजता ठोठवायचा दरवाजा आणि फेकायचा कंडोमची पाकिटं

विकृतीचा कळस! रात्री 2 वाजता ठोठवायचा दरवाजा आणि फेकायचा कंडोमची पाकिटं

रात्री उशिरा महिलेच्या घराचा दरवाजा जोरात वाजवायचा आणि...

रात्री उशिरा महिलेच्या घराचा दरवाजा जोरात वाजवायचा आणि...

रात्री उशिरा महिलेच्या घराचा दरवाजा जोरात वाजवायचा आणि...

  • Published by:  Akshay Shitole
बंगळुरू,08 फेब्रुवारी: रात्री दारावरील बेल वाजवून लोकांना त्रास देणारा माथेफिरूची घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. रात्री उशिरा महिलेच्या घराचा दरवाजा आणि खिडक्या जोरजोरात ठोठवण्याचा प्रकार बंगळुरु इथे समोर आला आहे. रात्री दरवाजे वाजवून तो कंडोमची पाकिटं घरात फेकायचा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अज्ञात माथेफिरूविरोधात महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुत्तेनहाली पुलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या महिलेनं अज्ञात माथेफिरूविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार रात्री दोन वाजता अज्ञात व्यक्ती महिलेच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या जोरजोरात ठोठवायचा. दरवाजा उघडत नाही हे लक्षात आल्यानंतर तो खिडकीचे दार ठोठवाय़चा. त्यानंतर त्याची हिंमत वाढली. तो खिडकी उघडून लाईट चालू-बंद करून महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करू लागला. घरातून कोणताही प्रतिसाद येत नाही हे लक्षात येताच त्याने खिडकीतून कंडोमची पाकिट फेकली. या घटनेनंतर महिलेनं तातडीनं शंभर नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली. मात्र तोपर्यंत माथेफिरू फरार झाला होता. महिलेनं हॉलमध्ये पाहिलं त्यावेळी खिडकीतून कंडोमची पाकिटं फेकल्याचं निदर्शनास आलं. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीनं स्थानिक पोलिसांकडून महिलेला अशा प्रकारे विकृतपणे त्रास देणाऱ्या माथेफिरूचा शोध सुरू आहे. या माथेफिरूविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा शोध घेत आहेत. सध्या या प्रकरणात अधिक माहिती मिळावी यासाठी महिलेकची चौकशी करत आहे. ज्याद्वारे आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचणं शक्य होईल. हेही वाचा-घरच्यांनी प्रेमाला नाकारलं, मुलीने मुलाचं घरं गाठलं पण... हेही वाचा-डोंबिवली : मित्राने सेक्ससाठी नकार दिल्याने खून करून सुटकेसमध्ये कोंबला मृतदेह
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या