मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! गुजरातमध्ये दलित मुलीवर गँग रेप आणि निर्घृण हत्या

धक्कादायक! गुजरातमध्ये दलित मुलीवर गँग रेप आणि निर्घृण हत्या

पीडित मुलगी 31 डिसेंबरपासून बेपत्ता होती. 5 जानेवारी मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पीडित मुलगी 31 डिसेंबरपासून बेपत्ता होती. 5 जानेवारी मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पीडित मुलगी 31 डिसेंबरपासून बेपत्ता होती. 5 जानेवारी मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही कारवाईची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
अहमदाबाद,10 जानेवारी: गुजरातमध्ये पुन्हा एका दलित मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर चौघा नराधमाना तिची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दलित मुलीची बलात्कार करून हत्या गुजरातमधील अरवली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षाच्या दलित मुलीवर चौघा नराधमांनी बलात्कार केला. बलात्कार करून नंतर दलित मुलीची हत्या केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळं दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. दलित समाजाचं पोलीस स्टेशनसमोर आंदोलन पीडित मुलगी 31 डिसेंबरपासून बेपत्ता होती. तिच्या शोध तिचे कुटुंबीय घेत होते. मात्र 5 जानेवारी मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. पीडितेच्या कुटुंबियाला याची माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हजारो दलित समुदायानं घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दलित समुदायानं मोदसा पोलीस स्टेशनसमोर प्रदर्शन केलं. याप्रकरणी दोषी नराधमांना तातडीन अटक करण्याची मागणी दलित समुदायान केली. तसेच त्यावेळी पोलीस स्टेशनला उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबत करण्याची मागणी करण्यात आली आहे. दलित समुदायात वाढता रोष पाहून पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. चौघा नराधमांविरोधात गुन्हा दलित समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आंदोलन केलं. त्यामुळं पोलीस खडबडून जागी झाली. पोलिसांनी त्यानतंर अनुसुचित जाती अनुसुचित जनजाती अत्याचार अधिनिय आणि आयपीसीच्या विविध कलमान्वे आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या यारोपींमध्ये बिमल भरवाद, दर्शन भरवाद, सतीश भरवाद आणि जिगर याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नराधम आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत पीडितेच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह नेण्यास नकार दिला होता. मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी पीडितेचा मृतदेह नेला. मात्र पोलिसांनी आरोपिंविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या भूमिकेवर संशय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन त्याची माहिती दिली. मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद घेण्यास नकार दिला. तुझी मुलगी लग्न करून पळून गेली आहे. असं उत्तर मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी दिलं असल्याची माहिती दलितांच्या अधिकारासाठी लढणारे कांतीलाल परमार यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. 3 जानेवारीला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी कुटुंब गेलं होतं. मात्र त्यानंतर दोन दिवसानंतर मुलीचा मृतदेह मिळाला आहे.त्यामुळे मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. तसेच याप्रकरणाची तातडीनं चौकशी करून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आयोगाची नोटीस याप्रकरणाची गंभीर दखल अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगानं घेतली आहे. अनुसुचित जाती आयोगानं गुजरातमधील अरावली जिल्हा पोलीस अधिक्षकांना नोटीस पाठवली आहे. तसेच याप्रकरणाची तातडीनं चौकशी करून अहवाल सादर कऱण्याचे आदेश आयोगानं पोलिसांना दिले आहे. तसेच याप्रकरणी आता पोलिसांनीही वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस आता पीडित मुलीच्या एफएसएल रिपोर्टची वाट पाहत आहे. एफएसएल रिपोर्ट आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहे. --- अन्य बातम्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या बॅगेत सापडली Lipstick, शिक्षकाने रॉडने केली मारहाण 'विशिष्ट धर्माला लक्ष्य करणं अयोग्य' : साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली आली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू
First published:

Tags: Dalit, Girl raped, Gujra dalit rape and murder, Gujrat dalit

पुढील बातम्या