पटना, 3 ऑगस्ट : बिहारमधील (Bihar) गयामध्ये (Gaya) एका गोल्ड लोन कंपनीत (Gold Loan company) दरोडा टाकून दरोडेखोरांनी दिवसाढवळया लाखो रुपये लुटून नेले. मंगळवारी दुपारी चार दरोडेखोरांनी पिस्तुलचा (Pistal) धाक दाखवत 12 मिनिटांत दरोडा टाकला. तब्बल 2 किलो सोनं (2 KG Gold) दरोडेखोरांनी लुटून नेलं.
अशी घडली घटना
गया-नवादा मुख्य रस्त्यावर आशीर्वाद गोल्ड लोन संस्था आहे. या ठिकाणी काही चौकशी करण्याच्या बहाण्यानं सुरुवातीला दोघे आत आले. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे आणखी दोन साथीदार आत आले. त्यांनी अचानक खिशातून पिस्तुल काढून कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन काढून घेतले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एका कोपऱ्यात नेऊन उभं केलं. यावेळी दुकानाचे व्यवस्थापक बाहेर गेले होते. मात्र ते येईपर्यंत दरोडेखोरांनी वाट पाहिली आणि त्यानंतर पिस्तुल बाहेर काढली.
सायरन वाजला तरी...
दरोडेखोरांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकरची किल्ली मागितली. ती किल्ली मिळाल्यानंतर त्यांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकीच्या पद्धतीने तो उघडण्याचा प्रयत्न झाल्याने अलार्म वाजायला सुरुवात झाली. हे पाहून दरोडेखोरांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न थांबवला आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा धमकावलं. तातडीनं अलार्म बंद केला नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिल्याने कर्मचाऱ्यांनी अलार्म बंद केला.
त्यानंतर दरोडेखोरांनी लॉकर उघडून त्यातून 2 किलो सोनं आणि 3 लाख रुपये लंपास केले. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी बाईकवरून पळ काढला. दरोडेखोर दोन वेगवेगळ्या बाईकवरून वेगवेगळ्या दिशेला फरार झाले.
हे वाचा -मोठी बातमी! शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, या विषयांवर झाली महत्त्वाची चर्चा
पोलीस तपास सुरू
ही घटना घडल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, अलार्म वाजूनही आजूबाजूच्या दुकानातील कुणीही मदतीला न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरोडेखोरांच्या घाईगडबडीमुळे अलार्म वाजला होता आणि आजूबाजूची दुकाने उघडी होती. तरीही या घटनेचा कुणालाही पत्ता लागला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.