मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /देशातील अर्ध्या लोकसंख्येचा डेटा चोरी; फोन पे, झोमॅटो ते इन्स्टा वापरणाऱ्यांची माहिती विकली

देशातील अर्ध्या लोकसंख्येचा डेटा चोरी; फोन पे, झोमॅटो ते इन्स्टा वापरणाऱ्यांची माहिती विकली

आरोपीने चोरलेल्या डेटाची 104 प्रकारात वर्गवारी केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी ते ज्येष्ठ नागरिकांच्या डेटाचाही समावेश आहे.

आरोपीने चोरलेल्या डेटाची 104 प्रकारात वर्गवारी केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी ते ज्येष्ठ नागरिकांच्या डेटाचाही समावेश आहे.

आरोपीने चोरलेल्या डेटाची 104 प्रकारात वर्गवारी केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी ते ज्येष्ठ नागरिकांच्या डेटाचाही समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 02 एप्रिल : देशातील सर्वात मोठ्या डेटा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून त्यातून समोर आलेल्या माहितीने खळबळ उडाली आहे. तेलंगणातील सायबराबाद पोलिसांनी शनिवारी सांगितले की, २४ राज्ये आणि ८ मेट्रो शहरांमधील ६६.९ कोटी लोकांचा आणि खासगी संस्थांची गोपनीय माहिती चोरण्यात आली आहे. तसंच या माहितीची विक्रीही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनय भारद्वाजजवळ शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या विद्यार्थ्यांचा डेटा आढळून आला आहे. त्याने जीएसटी, विविध राज्यांच्या रस्ते परिवहन संघटना, प्रमुख ई कॉमर्स पोर्टल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फिन टेक कंपन्यांच्या ग्राहकांचा डेटाही चोरला होता. यात स्विगी, झोमॅटो, बायजू, अमेझॉन, नेटफ्लिक्स, युट्यूब, पेटीएम, फोन पे, बिग बास्केट, बूक माय शो, इन्स्टाग्राम यासारख्या कंपन्यांच्या ग्राहकांचा डेटा होता.

SBI यूझर्सना मोठा धक्का! क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल, आता... 

अटक करण्यात आलेल्या आरोपीने १०४ प्रकारात डेटाचं वर्गीकरण केलं होतं. त्याला डेटा विक्री करताना पकडण्यात आलं. आरोपीकडे सापडलेल्या डेटामध्ये सुरक्षा कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पॅनकार्ड धारक, नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिल्लीतील वीज ग्राहक, डीमॅट खातेधारक, नीट विद्यार्थी, श्रीमंत व्यक्ती, विमाधारक, क्रेडिट-डेबिट कार्ड धारक यांचा डेटा आणि मोबाईल नंबरचा समावेश आहे.

पोलिसांनी दोन मोबाईल, दोन लॅपटॉप आणि सरकारी, खासगी संस्था, व्यक्ती यांची संवेदनशील माहिती असलेला डेटा जप्त केला. आरोपी हरयाणातील वेबसाइड इन्स्पायरवेब्जच्या माध्यमातून काम करत होता. तो क्लाउड ड्राइव्हच्या लिंकद्वारे ग्राहकांना डेटा विकत होता.

First published:
top videos

    Tags: Cyber crime