Home /News /crime /

सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपी 'अशाही' पद्धतीने चोरला जाऊ शकतो

सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपी 'अशाही' पद्धतीने चोरला जाऊ शकतो

डिजीटल पेमेंट करत असताना नेहमी फोनवर एक OTP अर्थात वन टाइम पासवर्ड येतो. संबंधित OTP टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे तुमचा OTP कोणाशीही शेअर करू नये.

    मुंबई, 14 जानेवारी : जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वच व्यवहार ऑनलाईन व्हायला लागले. त्यातच ऑनलाईन फसवणुकीच्या (fraud) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणजेच सायबर क्राईमचं (Cyber Crime) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. फसवणुकीच्या नवनवीन पद्धतीही आजमावल्या जात असून, हॅकर्स घरी बसून आपली बँक खाती रिकामी करू शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंक्स, आकर्षक ऑफर्स आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहणं गरजेचं झालं आहे. सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता सरकारकडून नागरिकांना वेळोवेळी सतर्क करण्यात येत आहे. सायबर क्राईमबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गृह मंत्रालयाने सायबर दोस्त (Cyber Dost) नावाचं अॅप तयार केलं आहे. 'सायबर दोस्त'च्या (Cyber Dost) माध्यमातून सरकारने एका नव्या धोक्यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला आहे. सरकारने नागरिकांना OTP फसवणुकीबद्दल सतर्क (OTP Fraud) केलं आहे. कॉलमार्फतही तुमच्या फोनमधून OTP चोरला जाऊ शकतो, असं 'सायबर दोस्त'नं म्हटलं आहे. (संक्रातीदिवशीच नव्हे संपूर्ण हिवाळ्यात खा तिळगुळाच्या वड्या; तब्येत राहील ठणठणीत) अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलताना कॉल मर्ज करू नका, असा सल्ला सरकारने दिला आहे. कॉल मर्ज होताच, हॅकर्स ओटीपी जाणून घेऊ शकतात आणि काही सेकंदात तुमचं बँक खातं रिकामं करू शकतात. म्हणून खबरदारी बाळगा; पण तुमची फसवणूक झाली, तर cybercrime.gov.in वर तुम्ही तक्रार नोंदवू शकता, अशी माहिती देण्यात आली आहे. डिजीटल पेमेंट करत असताना नेहमी फोनवर एक OTP अर्थात वन टाइम पासवर्ड येतो. संबंधित OTP टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे तुमचा OTP कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. डेबिट कार्ड क्रमांक, बँकिंग युझर आयडी, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही सांगू नका. अन्यथा तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. तसंच काही जण बँक खात्याचा क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांकाचा फोटो काढून ठेवतात; पण हे फोटो चुकून कुठे तरी शेअर होऊ शकतात. त्यामुळे असे फोटो काढून ठेवू नयेत. तसंच सार्वजनिक इंटरनेटचा वापर व्यवहार करण्यासाठी करू नये. (केंद्र सरकारचं 14 महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीच्या दिवशी गिफ्ट) व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सुरक्षेसंदर्भात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे युझर्सनी कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू नये, असं कॅस्परस्की या सायबर सिक्युरिटी कंपनीचे (cybersecurity company Kaspersky) संचालक दिमित्री बेस्टुझेव्ह (Dmitry Bestuzhev) यांनी म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित असल्याचं अनेकांना वाटतं; पण स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या डेटावर लक्ष ठेवून असतात आणि संधीच्या शोधात असतात, असंही ते म्हणाले.
    First published:

    पुढील बातम्या