नवी दिल्ली, 10 मार्च: सध्या देशात कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) नावाखाली सायबर गुन्हेगार वयोवृद्धांना टार्गेट (Cyber criminal targets elderly people) करीत आहेत. एकटे राहणारे आणि सतत मोबाईल वापरणारे वयोवृद्ध लोकं या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजपणे फसत आहेत. लसीकरण मोहिमेत नाव नोंदवून घेण्याच्या नावाखाली सायबर चोरटे वयोवृद्धांचा सर्व तपशील मागून घेत आहेत. अशा माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार त्यांचे बँक अकाऊंट रिकामं (Financial Faraud) करत आहेत. दिल्लीसह मुंबई, बेंगळुरू, कोलकाता अशा सर्व ठिकाणी याप्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सायबर तज्ज्ञ आणि पोलिसांनी इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने 60 वर्षांवरील वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीकरणाची घोषणा केल्यानंतर, वयोवृद्धांना टार्गेट करणारे सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत. यामुळे सायबर विश्वात ज्येष्ठांच्या डेटाची मागणी वाढली आहे. सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांनी सांगितलं की, सरकार जेव्हा एखाद्या विशिष्ट वयोगटासाठी विशिष्ट योजना सुरू करते. तेव्हा सायबप विश्वात संबंधित वयोगटाच्या डेटाची मागणी वाढते. हा डेटा प्रति व्यक्ती प्रति 1 पैसे एवढ्या किमतीत सहजतेनं उपलब्ध होतो. सायबर गुन्हेगार अशा डेटा कंपन्यांकडून खरेदी करून ते वृद्धांना टार्गेट करीत आहेत.
याच माहितीच्या अधारे, सायबर चोरटे वयोवृद्धांना फोन करतात आणि आपण संबंधित सरकारी योजनेतील कर्मचारी बोलत असल्याचा भासवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मागितली जाते. तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी सांगायला लावूक बँक खातं रिकामं केलं जात आहे. त्यामुळे असा फोन आल्यास संवेदनशील माहिती देवू नका असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
हे ही वाचा - एक फोन करेल घात! 'या' नंबरपासून सावधान, रिकामं होतंय बँक खातं
अशी घ्या खबरदारी
सायबर तज्ज्ञ कनिष्क गौढ यांनी सांगितलं की, मोबाईलवर पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. मोबाइलवर कोरोना लसीकरण संबंधित लिंक पाठवून सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसेच, मोबाईलवरून कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीला देवू नका. गाझियाबादचे एसपी सिटी निपुण अग्रवाल यांनी सांगितलं की, शहरातील लोकांना मदत करण्यासाठी सायबर सेवा केंद्र तयार करण्यात आलं आहे. याठिकाणी वयोवृद्ध लोकं त्वरित तक्रार दाखल करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.