• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Cyber Attack: हॅकर्सनी 9.9 कोटी भारतीयांना केलं टार्गेट; क्रेडिट कार्डसह बँक तपशीलावर मारला डल्ला

Cyber Attack: हॅकर्सनी 9.9 कोटी भारतीयांना केलं टार्गेट; क्रेडिट कार्डसह बँक तपशीलावर मारला डल्ला

Cyber Attack on Payment App: गेल्या काही काळापासून सायबर हल्लेखोर (Hackers) भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना (Indian internet users) लक्ष्य करत आहेत. यावेळी त्यांनी मोबिक्विक नावाच्या पेमेंट अॅपला (Mobikwik Payment App) लक्ष्य केलं असून 9.9. कोटी भारतीयांचा संवेदनशील डेटा चोरला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 मार्च: गेल्या काही काळापासून सायबर हल्लेखोर (Hackers) भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना (Indian internet users) लक्ष्य करत आहेत. मागील काही दिवसांपासून सायबर हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावेळी हॅकर्सनी असा दावा केला आहे की, त्यांनी पेमेंट अॅप मोबिक्विकच्या (Mobikwik Payment App) कोट्यावधी भारतीय वापरकर्त्यांची गोपनीय माहिती चोरली आहे. या अ‍ॅपद्वारे दररोज 10 लाखाहून अधिक व्यवहार केले जातात. सध्या या अॅपसोबत 30 लाखाहून अधिक व्यापारी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर मोबिक्विकच्या ग्राहकांची संख्या 12 कोटींपेक्षा जास्त आहे. मोबिक्विक अॅपमध्ये सेकोइया कॅपिटल आणि बजाज फायनान्स यांची मोठी गुंतवणूक आहे. ही कंपनी कंपनी सध्या व्हॉट्सअ‍ॅप पे, गुगल पे, फोन पे आणि पेटीएमसोबत स्पर्धा करत आहे. हॅकर्सनी डेटा लीक करण्याऐवजी कंपनीकडे केली पैशांची मागणी सायबर सुरक्षा विश्लेषक राजशेखर राजहरिया यांनी याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), इंडियन कम्प्युटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीम (ICERT) त्याचबरोबर  पीसीआय मानके आणि पेमेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांना याबाबत लेखी माहिती दिली आहे. हॅकर्सची टीम जॉर्डनेवनने डेटाबेसची लिंक भारतीय वृत्तसंस्था पीटीआयला ईमेल केली आहे. हा डेटा वापरण्याचा आमचा हेतू नाही, असंही या गटाने नमूद केलं आहे. या ग्रुपचं म्हणणं आहे की, आम्हाला केवळ कंपनीकडून पैसे हवे आहेत, त्यानंतर तो डेटा आम्ही इंटरनेटवरून हटवू. मोबिक्विकने डेटाबेस चोरीचा दावा फेटाळला मोबिक्विकचे संस्थापक बिपिन प्रीत सिंह आणि मोबिक्विकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपासान ताकू यांचा तपशीलही जॉर्डनवनने शेअर केला आहे. असं असूनही हॅकर्सचा दावा खोटा असल्याचा दावा मोबिक्विकने केला आहे. मोबिक्विक कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, आम्ही डेटा सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेत आहोत आणि डेटा संरक्षणासंबंधित कायद्यांचं पुरेपूर पालन करत आहोत. हे ही वाचा- एक फोन करेल घात! 'या' नंबरपासून सावधान, रिकामं होतंय बँक खातं दुसरीकडे हॅकर टीमने मोबिक्विकच्या क्यूआर कोडची बरेच फोटो आणि त्यांच्या ग्राहकांना ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा बराच तपशीलही अपलोड केला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याची माहीती मोबिक्विक कंपनीने दिली आहे. त्याचबरोबर कंपनी थर्ड पार्टीकडून फॉरेन्सिक डेटा सेफ्टी ऑडिट देखील करणार आहे. तसेच मोबिक्विकची सर्व खाती आणि त्यात जमा रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: