अहमदाबाद, 11 जानेवारी: तुम्ही हायवेवरून प्रवास करताना वेगवेगळ्या हॉटेलांत थांबून चहा-कॉफी पित असाल तर जरा सावध व्हा. अहमदाबादेतल्या एका बँक मॅनेजरनी एसजी हायवेवर अशीच एक कप कॉफी घेतली पण ती त्याला तब्बल 50 हजार रुपयांना पडली.
एका बँकेचा मॅनेजर अहमदाबादजवळच्या एसजी हायवेवरून चालला होता. त्याला लहर आली म्हणून तो कॉफी प्यायला एका हॉटेलात थांबला. बरेचदा आपणही हायवेवर असं थांबतो. पण त्यावेळी आपण जिथं जागा मिळेल तिथं गाडी पार्क करतो. तसंच या बँक मॅनेजरनी केलं. गाडी पार्क करून गेला. कॉफी पिऊन आल्यावर पाहतो तर काय? त्याच्या कारच्या काचा फोडून त्यातून काही कागदपत्रं आणि 50 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्यामुळे साधी कॉफी त्याला 50 हजार रुपयांना पडली.
महाराष्ट्रातल्या एका खासगी बँकेत सीनिअर मॅनेजर पदावर काम करणारे निशांत पटेल आपली बायको आणि सासूबाईंसोबत 8 जानेवारीला अहमदाबादमध्ये आले होते. घर बरेच दिवस बंद होतं म्हणून ते कोर्टयार्ड मॅरिएट हॉटेलातच थांबले. नंतर बायकोसोबत निशांत हायवेवरील गोयल प्लाझाजवळ असलेल्या शंभू कॉफी बारमध्ये कॉफी प्यायला थांबले. परत आल्यावर त्यांच्या कारच्या काचा फोडल्या होत्या आणि आतला 50 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्याचबरोबर काही कागदपत्रंही चोरीला गेली होती. त्यानंतर निशांत यांनी वस्रापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढचा तपास करत आहेत.
हे वाचा-'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
तुम्हीही अनेकदा कारने प्रवासाला जात असाल. सोबत मौल्यवान वस्तू, दागिने, लॅपटॉप असतील तर विशेष काळजी घ्या. कार योग्य ठिकाणी पार्क करा जिथं रखवालदार असेल. महागड्या वस्तू स्वत: सोबत न्या. गाडीत ठेवून जाऊ नका. किंवा ते शक्य नसेल तर एखाद्या व्यक्तीला कारमध्येच बसून रहायला सांगा. ती व्यक्ती तुम्ही आल्यानंतर कॉफी घेऊन येईल. कारण अशा अनोळखी ठिकाणी तुम्हीच तुमच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असता. ती सुरक्षितता बाळगली नाही तर तोटा तुमचाच होऊ शकतो. लॅपटॉपमध्ये अनेकदा महत्त्वाची आणि गुप्त माहिती असते त्यामुळे तीही चोरांच्या हाती लागू शकते. त्यामुळे कायमच काळजी घ्यायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad, Crime news