मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

4 महिन्यांच्या बाळाच्या रडण्यामुळे Video Game खेळात अडथळा; बापाने इतकं मारलं की मुलीचा जीवच गेला

4 महिन्यांच्या बाळाच्या रडण्यामुळे Video Game खेळात अडथळा; बापाने इतकं मारलं की मुलीचा जीवच गेला

मुलांचा आवाज ऐकून पालकांचा दिवस साजरा होतो. पण एक बाप कधी त्याच्या मुलाच्या आवाजाने इतका चिडू शकतो आणि त्याला जीवे मारू शकतो का?

मुलांचा आवाज ऐकून पालकांचा दिवस साजरा होतो. पण एक बाप कधी त्याच्या मुलाच्या आवाजाने इतका चिडू शकतो आणि त्याला जीवे मारू शकतो का?

मुलांचा आवाज ऐकून पालकांचा दिवस साजरा होतो. पण एक बाप कधी त्याच्या मुलाच्या आवाजाने इतका चिडू शकतो आणि त्याला जीवे मारू शकतो का?

  • Published by:  Meenal Gangurde

मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालक काय करत नाहीत? आई-वडील त्यांच्या आयुष्याची मेहनत फक्त मुलांच्या आनंदावर खर्च करतात. मुलांचा आवाज ऐकून पालकांचा दिवस साजरा होतो. पण एक बाप कधी त्याच्या मुलाच्या आवाजाने इतका चिडू शकतो आणि त्याला जीवे मारू शकतो का? तुम्हाला असं वाटत असेल की हे कधीही घडू शकत नाही. पण इंग्लंडमधील लिव्हरपूलमधून (Liverpool) असच एक प्रकरण समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या 29 वर्षीय वडिलांनी आपल्या चार महिन्यांच्या मुलीला इतकी मारहाण केली की त्यातच तिचा जीव गेला. (Father Killed Daughter) .

लिव्हरपूरमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय जॉर्डन आणि त्याच्या पत्नीने एक लहानशी मुलगी होती. घटनेच्या दिवशी जॉर्डनची पत्नी मुलीला घरी त्याच्याजवळ सोडून कामावर गेली होती. जॉर्डन विलो नावाच्या बाळासोबत घरीच होता. मात्र अचानक विलो रडू लागली. ती खूप जोरजोरात रडत होती. विलोच्या आवाजामुळे जॉर्डन व्हिडीओ गेम खेळू शकत नव्हता. यामुळे विलोने मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

शेजारच्यांनी आवाज ऐकला

घटनेच्या दिवशी शेजारच्यांनी आधी जॉर्डनच्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकला. यानंतर त्यांनी जॉर्डनचा ओरडण्याचा आवाज ऐकला. तो जोरजोरात ओरडत होता. यानंतर मारल्याचाही आवाज येऊ लागला. त्यानंतर एकदम शांतता पसरली. जॉर्डनने स्वत: आपल्या जखमी बाळाला रुग्णालयात नेलं. येथे तीन दिवसांनंतर विलोचा मृत्यू झाला. सुरुवातीला जॉर्डनने सांगितलं की, विलो सोफ्यावर खाली पडली. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला खूप जोरजोरात गालावर मारण्यात आलं होतं.

हे ही वाचा-...अन् 26 दिवसानंतर उलगडलं त्या चिमुकल्याच्या मृत्यूचं रहस्य; अंगावर येईल काटा

कान आणि गालावर होत्या जखमा

विलोच्या कान आणि गालावर जखमा होत्या. सोबतच तिच्या डोक्यावरही जखमा होत्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू पूर्वी विलो खूप त्रासातून गेली. कोर्टाने या प्रकरणात जॉर्डनला 16 वर्षांची शिक्षा सुनावली. विलोची आई म्हणाली की, तिचं हसू इतकं गोड होतं की, तिला पाहून कोणीही खूष होईल. बाळाच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे तिची हत्या केल्याबाबत त्यांच्या घरातील मंडळींचा विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे.

First published:

Tags: Baby died, Crime news, Murder