आगरतळा, 31 ऑक्टोबर : त्रिपुरा (Tripura) मध्ये एका 90 वर्षीय वृद्ध महिलेसोबत तिच्याच घरात घुसून दोघांनी सामूहिक बलात्कार (Gang-raped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 24 ऑक्टोबर रोजी त्रिपुरा जिल्ह्यातील कंचनपूरमधील एका गावात घडली. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी महिलेच्या कुटुंबीयानी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली.
पोलीस अधिक्षक भानुपद चक्रवर्तींनी सांगितलं की, वृद्ध महिलेवर बलात्कार करणारे दोन्ही आरोपी फरार आहेत, त्यांनी पकडण्यासाठी तपास सुरू आहे.
महिलेला आजी म्हणायचा आरोपी
अधिकाऱ्याने सांगितले की, त्यापैकी एक आरोपी महिलेला आजी म्हणायचा. ती महिला घरात एकटी राहत होती. घटनेच्या रात्री आरोपी आणि दुसरा व्यक्ती एकत्रितपणे घरात घुसले आणि वृद्ध महिलेसोबत बलात्कार केला. या घटनेनंतर महिला आजारी पडली होती, मात्र तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही.
हे ही वाचा-धक्कादायक! 'बाबा' म्हणत नाही म्हणून दीड वर्षांच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके
घटनेच्या 5 दिवसांनंतर तक्रार केली दाखल
त्यांनी सांगितले की, जेव्हा कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली, त्यांनी 5 दिवसांनंतर पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस त्यांना रुग्णालयात घेऊन गेला व महिलेचा जबाबही नोंदवून घेतला आहे. ज्याच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ते म्हणाले की, सध्या महिला आपल्या घरी आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित वृद्ध महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही. देशात वाढणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूरातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील तरुणांकडून वारंवार होणार विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ सहन न झाल्यानं महाविद्यालयीन तरुणीनं तणनाशक (शेतात फवारणी करणारं औषध) प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर संतप्त जमावाकडून संशयित आरोपींच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यामुळे नणुंद्रे गावात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gang Rape