Home /News /crime /

पगार हजारोंमध्ये अन् संपत्ती करोडोंची; अलिशान इमारत, लाखोंची रोकड, गाड्या.., क्लर्कची संपत्ती पाहून अधिकारीही थक्क

पगार हजारोंमध्ये अन् संपत्ती करोडोंची; अलिशान इमारत, लाखोंची रोकड, गाड्या.., क्लर्कची संपत्ती पाहून अधिकारीही थक्क

हिरो केसवानीच्या घरातून सुमारे 85 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची जमीन आणि घराची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

    पाटणा 04 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत लिपिक हिरो केसवानीच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा उघडकीस आला आहे. एवढी संपत्ती पाहून तपासासाठी आलेले अधिकारीही चक्रावले. छाप्यात हिरो केसवानीच्या घरातून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली आहे. हिरो केसवानीच्या घरातून सुमारे 85 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय कोट्यवधी रुपयांची जमीन आणि घराची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हिरो केसवानीच्या घरातून जमिनीच्या कराराशी संबंधित अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीकडे सुमारे चार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची कागदपत्रे मिळाली आहेत. औरंगाबादमध्ये हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुल आढळलं धक्कादायक अवस्थेत! 29 जुलैपासून होतं वास्तव्य हिरो केसवानीची तीन मजली आलिशान इमारत आणि प्रत्येक मजल्यावरील आलिशान इंटीरियर आणि सजावटीचे काम पाहून EOW टीम थक्क झाली. घराच्या प्रत्येक खोलीत पॅनलिंग आणि लाकूडकाम करण्यात आले आहे. छतावर आलिशान पेंट हाऊस बांधण्यात आले आहे. बैरागढमधील हिरो केसवानी यांच्या इमारतीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. बैरागढच्या आसपास विकसित होत असलेल्या वसाहतींमध्ये हिरो केसवानी यांनी महागडे भूखंड खरेदी केले आहेत. हिरो केसवानीने बहुतांश मालमत्ता आपल्या पत्नीच्या नावावर खरेदी केल्या असून अनेक मालमत्तांची खरेदी-विक्रीही करण्यात आली आहे. हिरो केसवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यातही लाखो रुपये जमा झाल्याचे आढळून आले आहे. आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे आढळून आले. गँगस्टर छोटा शकीलच्या 3 साथीदारांना मुंबई पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण? हिरो केसवानी याच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केल्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीच्या घरी तीन चारचाकी आणि एक अॅक्टिव्हा स्कूटर सापडली आहे. हिरो केसवानीने 4,000 रुपये प्रति महिना पगार घेऊन नोकरी सुरू केली होती आणि सध्या त्याचा पगार 50,000 रुपये प्रति महिना आहे. अशा स्थितीत अशा काळ्या संपत्तीने सर्वांनाच चकित केले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Money fraud

    पुढील बातम्या