मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आपल्याहून 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकाबरोबर पळून गेली कोट्यधीशाची बायको; 47 लाख रुपये घेऊन पसार

आपल्याहून 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकाबरोबर पळून गेली कोट्यधीशाची बायको; 47 लाख रुपये घेऊन पसार

प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीचे आणि ऑटोचालकाचे प्रेमप्रकरण चालू होते. यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पत्नी पतीचे 47 लाख रुपये घेऊन गायब झाली.

प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीचे आणि ऑटोचालकाचे प्रेमप्रकरण चालू होते. यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पत्नी पतीचे 47 लाख रुपये घेऊन गायब झाली.

प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीचे आणि ऑटोचालकाचे प्रेमप्रकरण चालू होते. यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पत्नी पतीचे 47 लाख रुपये घेऊन गायब झाली.

  • Published by:  News18 Desk

इंदूर, 26 ऑक्टोबर : एका करोडपती प्रॉपर्टी ब्रोकरच्या पत्नीच्या शोधात पोलीस सध्या गुजरात, मुंबई, उज्जैन, रतलाम आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांमध्ये चकरा मारत आहेत. करोडपती प्रॉपर्टी डीलरची (Broker wife) पत्नी तिच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या ऑटो चालकासह (auto driver) फरार झाली आहे. प्रॉपर्टी डीलरच्या पत्नीचे आणि ऑटोचालकाचे प्रेमप्रकरण चालू होते. यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पत्नी पतीचे 47 लाख रुपये घेऊन गायब झाली. यातील आरोपी ऑटोचालकाच्या दोन मित्रांकडून पोलिसांनी 34 लाख रुपये जप्त केले आहेत. मात्र, पोलीस अद्याप ही महिला आणि तिचा प्रियकर ऑटोचालकाला शोधू शकलेले (Crorepati Property Broker wife Eloped with auto driver) नाहीत.

याप्रकरणी प्रॉपर्टी ब्रोकर पतीने लेखी तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी 45 वर्षांची असल्याचे सांगितले जाते, ती 32 वर्षीय प्रियकर इम्रानसोबत फरार झाली आहे. इम्रानचे दोन मित्र रितेश ठाकूर आणि फुरकान यांच्याकडून 34 लाख रुपये जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी प्रॉपर्टी ब्रोकरने घरातून 47 लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार इंदूर पोलिसांकडे केली होती. त्याने आपल्या पत्नीवर चोरीचा संशय व्यक्त केला आणि त्यात तिचा प्रियकर इम्रानही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितली. तेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी इम्रानच्या मित्रांकडून रोख रक्कम हस्तगत केली. घराच्या तिजोरीची चावी महिलेकडे असायची, असे तक्रारीत म्हटले आहे.

हे वाचा - नवऱ्याच्या Social media post ला जास्त Like, चढला बायकोचा पारा; वाद इतका पेटला की…

मध्यप्रदेशातील या शहरांमध्ये पोलिसांचे छापे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून गेलेली महिला इंदूरच्या हाजी कॉलनीत राहते. तिच्या पतीकडे करोडो रुपयांची जमीन आणि बरीच जंगम मालमत्ता देखील आहे. या महिलेच्या माहेरची परिस्थितीही खूप चांगली आहे. ऑटोचालक इमरानसोबत तिचे काही महिन्यांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. इंदूर पोलिसांच्या पथकाने दोघांच्या शोधात रतलाम, उज्जैन आणि जावरा येथेही छापे टाकले आहेत.

इंदूर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, पतीने पत्नी न सांगता घरातून गायब झाल्याचे सांगितले होते. तिचा मोबाईलही बंद आहे. नंतर तिचे ऑटोचालकाशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. ही महिला त्याच्यासोबत घरात असलेला रोकड घेऊन पळून गेली. दोघांचे लोकेशन जावरा येथे आढळून आले. पोलिसांचे पथक तेथे गेले, मात्र ते तेथे सापडले नाहीत.

हे वाचा - नदीत वाहून आलेल्या बोटं आणि मांस प्रकरणाचे गुढ उकलले, खेडमधील मनसुन्न करणारी घटना

गुजरात-मुंबईत असण्याची शक्यता

पोलीस ठाणे प्रभारी दिनेश शर्मा यांनी सांगितले की, महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून ऑटोचालक इम्रान आणि त्याचा मित्र रितेश ठाकूर यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेची भूमिकाही तपासली जात आहे. इम्रान आणि महिला दोघेही फरार आहेत. दोघांचा शोध घेण्यासाठी टीम मुंबई आणि गुजरातमध्येही गेली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि इम्रान गुजरात, मुंबईच्या दिशेने गेले असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Crime news, Love story