Home /News /crime /

Live Video: सराईत गुन्हेगारानं निवृत्त पोलिसाचा अडवला रस्ता; झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू

Live Video: सराईत गुन्हेगारानं निवृत्त पोलिसाचा अडवला रस्ता; झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू

Crime in Pune: पुण्यातील खडकी परिसरात एका गुन्हेगारांनं दारुच्या नशेत एका निवृत्त पोलिसांची गाडी अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यानंतर झालेल्या झटापटीत गुन्हेगार आरोपीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (viral video) होतं आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 14 एप्रिल: एका विचित्र घटनेनं पुणे शहर हादरलं आहे. पुण्यातील खडकी परिसरात एका गुन्हेगारांनं दारुच्या नशेत एका निवृत्त पोलिसांची गाडी अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यानंतर झालेल्या झटापटीत गुन्हेगार आरोपीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या भांडणाचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. 20 वर्षीय मृत तरुणाचं नाव मनीष काळूराम भोसले असून तो बोपोडी येथील रहिवासी आहे. मनीष हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यावेळी मृत मनीषने 61 वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचारी अनंत तुळशीराम ओव्हाळ यांची दुचाकी अडवली होती. घटनेच्या वेळी मनीष हा दारुच्या नशेत होता. मनीषने गाडी अडवून ओव्हाळ यांच्या गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या झटाझटीत 20 वर्षीय मनीषचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटना 12 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. यावेळी आरोपी अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त आले होते. यावेळी मनीष भोसले यांने काहीही कारण नसताना अनंत ओव्हाळ यांची दुचाकी अडवली. त्यानंतर मनीषने त्यांच्याशी वादही घातला. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना मारहाण करत असल्याचं स्पषपणे दिसत आहे. या व्हिडीओत सुरुवातीला मनीषने अनंत यांना मारहाण केल्याचं दिसत आहे. हे  वाचा- 'तू मेरी नही हुई तो...' म्हणत विकृत तरुणाने चाकूने कापले तरुणीचे ओठ, भिवंडी हादरली प्रत्युत्तरादाखल अनंत यांनी देखील त्याला मारहाण केली. त्यानंतर खाली पडलेल्या मनीषच्या छातीत आनंत ओव्हाळ यांनी लाथा घातल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी निवृत्त पोलीस कर्मचारी अनंत ओव्हाळ यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ओव्हाळ यांना अटक केली असून खडकी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Murder, Pune, Shocking video viral

पुढील बातम्या