मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Insta Post मुळे केला खून, अल्पवयीन मुलावर चाकूचे सपासप वार

Insta Post मुळे केला खून, अल्पवयीन मुलावर चाकूचे सपासप वार

इन्स्टाग्राम पोस्ट आवडली नाही, म्हणून एका गुंडानं अल्पवयीन तरुणाचा चाकूने भोसकून खून केला.

इन्स्टाग्राम पोस्ट आवडली नाही, म्हणून एका गुंडानं अल्पवयीन तरुणाचा चाकूने भोसकून खून केला.

इन्स्टाग्राम पोस्ट आवडली नाही, म्हणून एका गुंडानं अल्पवयीन तरुणाचा चाकूने भोसकून खून केला.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 29 डिसेंबर: इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) टाकल्यामुळे आपली बदनामी (Defame) झाल्याचा राग (Anger) आल्याने एका अट्टल गुंडाने (Criminla) अल्पवयीन तरुणाचा खून (Murder of minor boy) केला. समजात एक गुंड म्हणून बदनाम असणाऱ्याचा फोटो काढून एका तरुणाने तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यामुळे गुंड आणि त्याच्यासोबत असणारी काही अल्पवयीन मुलं कमालीची चिडली आणि ही पोस्ट करणाऱ्या तरुणाचा बदला घेण्याचा फैसला त्यांनी केला.

तरुणाचं केलं अपहरण

दिल्लीत राहणाऱ्या 17 वर्षांच्या शौकत नावाच्या तरुणानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्याच्याच परिसरात राहणाऱ्या सोहनलाल नावाच्या गुंडाच्या फोटो त्यानं पोस्ट केला होता आणि त्याच्याबद्दल काही ओळीदेखील लिहिल्या होत्या. या गोष्टीचा राग आल्यामुळे पोस्ट पाहताक्षणी सोहनलाल आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी शौकतचा शोध सुरू केला. लवकरच तो त्यांना सापडला. सर्वांनी मिळून त्याचं अपहरण केलं आणि त्याला एका फ्लॅटवर घेऊन गेले. तिथं चाकूने एकामागून एक वार करत त्याचा खून करण्यात आला. खून केल्यावर त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकून सगळे पळून गेले.

मृतदेहावरून तपास सुरू

रस्त्यात एक तरुण जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडल्याचा फोन पोलिसांना आला. त्यांनी घटनास्थळी जाऊन शौकतला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र त्याला उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरावर 10 ठिकाणी गंभीर आणि खोल वार करण्यात आले होते. आईस्क्रीम कट करण्याच्या टोकदार यंत्राचा वापर करून त्याला भोसकण्यात आलं होतं. पोलिसांनी शौकतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे.

हे वाचा- बायको पळाली! शोधणाऱ्याला मिळणार 5 हजार रुपये; नवऱ्याने दिली ऑफर

आरोपींचा शोध सुरू

शौकतचा खून करणारा मुख्य आरोपी सोहनलाल अद्याप फरार आहे. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून सोहनलालचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र एका पोस्टवरून तरुणाला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Crime, Instagram, Murder, Police