मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /15 वर्षांपासून फरार होता आरोपी, काही म्हणाले, 'मृत्यू झाला....' मात्र, एका टॅटूने खेळ संपवला!

15 वर्षांपासून फरार होता आरोपी, काही म्हणाले, 'मृत्यू झाला....' मात्र, एका टॅटूने खेळ संपवला!

मुंबई पोलीस - फाईल फोटो

मुंबई पोलीस - फाईल फोटो

एक आरोपी तब्बल 15 वर्षांपासून फरार होता.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 मार्च : मुंबई पोलिसांनी 15 वर्षांपूर्वी फरार झालेल्या एका आरोपीला पकडले होते. जामिनावर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. अनेक वर्षे शोध घेऊनही पोलिसांना त्याचा सुगावा लागला नाही. यादरम्यान त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला. त्याने कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही. अशा स्थितीत त्याचाही मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता. पण, त्यानंतर पोलिसांच्या हाती एक सुगावा लागला आणि 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले.

ही घटना मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. 2008 मध्ये पोलिसांनी अर्मुगम देवेंद्र आणि त्याच्या एका साथीदाराला येथील समुद्रात उभ्या असलेल्या जहाजातून तेल चोरल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात नंतर देवेंद्रला कोर्टातून जामीन मिळाला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने देवेंद्रचा जामीन फेटाळला. तेव्हापासून तो न्यायालयात तसेच पोलीस ठाण्यातही हजर झाला नाही.

पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. त्याने स्वत:ला कुटुंबीयांपासून वेगळे केले होते. यादरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता त्याची ओळख पटवण्याचा कोणताही मार्ग उरला नसल्याचे पोलिसांना वाटले होते.

हात धुण्यासाठी शेतकरी उतरला नदीच्या पाण्यात अन् मगरीने साधला डाव, पुढे झालं ते भयानक

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका खबऱ्याने स्थानिक पोलिसांना देवेंद्रची माहिती दिली होती, पण पोलिसांसमोर त्याला ओळखण्याचे खरे आव्हान होते. देवेंद्र पहिल्यांदा पकडला गेला तेव्हा तो 48 वर्षांचा होता. अशा परिस्थितीत वयाच्या 63 व्या वर्षी 15 वर्षांनी त्याची ओळख पटवणे सोपे नव्हते. दरम्यान, पोलिसांनी त्याची जुनी फाईल उघडली असता त्यात एक फोटो मिळाला. मात्र, यावरूनही त्याला ओळखणे सोपे नव्हते. फाइलची अधिक छाननी केली असता त्यात आणखी एक फोटो आढळून आला. हा फोटो त्याच्या हातावर बनवलेल्या टॅटूचा होता. हा फोटो मिळाल्यानंतर पोलिसांचा मार्ग सुकर झाला. पोलिसांनी त्याला पकडले आणि टॅटूची पडताळणी करून त्याला जेरबंद केले.

First published:
top videos

    Tags: Crime news, Local18, Marathi news, Mumbai police