लग्नाच्या मंडप तुफान राडा, फुलांच्या अक्षतांऐवजी लाथाबुक्क्यांचा मार, पाहा VIDEO

लग्नाच्या मंडपात वधू-वर पक्षातील सदस्यांनी एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 03:53 PM IST

लग्नाच्या मंडप तुफान राडा, फुलांच्या अक्षतांऐवजी लाथाबुक्क्यांचा मार, पाहा VIDEO

कोदाद, 02 नोव्हेंबर: लग्नाच्या मंडपात अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या नवरा-नवरीच्या डोक्यावर पडण्याऐवजी लाथा-बुक्या आणि खुर्ची एकमेकांवर फेकण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लग्न म्हणजे दोन माणसांची मन एकत्र आणणारं नाही तर दोन कुटुंबांना जोडणारा एक अतुट बंधन असं समजलं जातं. मात्र याच शुभकार्याला मोठ गालबोल लागलं आहे. तेलंगणा इथल्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात मात्र लग्न लागण्याआधीत तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या लग्नामध्ये वधू आणि वर पक्षातील सदस्य एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे तुटून पडले. सजलेल्या सभामंडपात लाथा-बुक्क्या आणि खुर्च्यां फेकण्याची स्पर्धा भरते असा प्रकार झाला. या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

29 ऑक्टोबरला सूर्यपेट इथल्या तरुणाचा आंध्र प्रदेशातील इंद्रजासोबत विवाह झाला. या विवाहानंतर वरात काढण्याच्या मुद्द्यावरुन दोन्हीकडच्या सदस्यांमध्ये घमासान झाले आणि अखेर वाद पेटला. कोदाद ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्ती साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वधू-वरात कोणतेही वाद नाही त्यामुळे गुन्हा दाखल करू नये असं सदस्यांनी सांगतल्यानं पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद सुटला खरा मात्र या प्रकरणात 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. पोलीस वेळीच पोहोचले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...