धक्कादायक! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आईला, हत्या करून बेडमध्ये लपवलं मुलाचं शीर

धक्कादायक! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आईला, हत्या करून बेडमध्ये लपवलं मुलाचं शीर

मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आईनं आपल्या सावत्र मुलाची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

  • Share this:

लखनौ, 15 सप्टेंबर : मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आईनं आपल्या सावत्र मुलाची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आईनं मुलाची हत्या केल्यानंतर त्याचं शीर बेडमध्ये लपवून ठेवलं होतं. ही संतापजनक घटना मेरठमधील आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलानं सावत्र आईला आपल्या काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिलं. यामुळे त्याचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी तिनं मुलाला जीवे ठारच मारलं. आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती कोणालाही कळू नये यासाठी तिनं त्याचं डोकं बेडमध्ये ठेवलं. पण तिने केलेला गुन्हा फार काळ लपून राहिला नाही. पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या. पण मुलाचा काका फरार आहे.

(वाचा :पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीचा गळा आवळून खून... मुलीच्याही हत्येचा प्रयत्न)

मेरठच्या सरधना येथील कपसाड गावातील ही घटना आहे. येथे 5 वर्षांचा आयुष्मान आपले वडील आणि सावत्र आईसोबत राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सावत्र आईचं आयुष्मानसोबत वर्तन चांगलं नव्हतं. यामुळे दररोज कौटुंबिक कलह निर्माण होत होते. यादरम्यान, गुरुवारी आयुष्मान अचानक बेपत्ता झाला. घरातला लाडका मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबीयांची धाकधुक वाढत होती. सर्वजण आयुष्मानचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता त्याच्या रुमपर्यंत पोहोचल्यानंतर घरातल्यानंतर मोठा धक्का बसला. येथे त्यांना शीर नसलेला आयुष्मानचा मृतदेह आढळून आला.

(वाचा : मध्यरात्री संभोग करण्यास पत्नीने दिला नकार.. CRPF च्या जवानाने डोक्यात घातली बॅट)

काकासोबतचं अफेअर कळू नये म्हणून केली चिमुरड्याची हत्या

सावत्र आईच्या संशयास्पद हालचालींवरून कुटुंबीयांचा तिच्यावरील संशय वाढला. ज्या बेडमध्ये आयुष्मानचं शीर लपवून ठेवलं होतं, त्यावर त्याची आई बसून होती. हा बेड उघडून पाहताच कुटुंबीयांच्या पाया खालची जमीनच सरकली. रक्तानं माखलेलं अवघ्या पाच वर्षांच्या आयुष्यमानचं शीर त्यांना तेथे मिळालं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना तातडीनं देण्यात आली. घटनास्थळावर दाखल होत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तसंच आरोपी महिलेला गजाआड देखील केलं. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं सांगितलं की, सावत्र मुलानं आपल्याला काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिलं होतं. ही गोष्ट कुठेही बाहेर येऊ नये म्हणून मुलाची हत्या केली.

(वाचा : प्रेमविवाह, तरीही दाम्पत्यात वाद.. पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या)

काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 02:13 PM IST

ताज्या बातम्या