मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

13 वर्षांच्या मुलीच्या पोटात 2 महिन्यांचा गर्भ, डॉक्टरच्या तपासणीमध्ये धक्कादायक प्रकार उघड

13 वर्षांच्या मुलीच्या पोटात 2 महिन्यांचा गर्भ, डॉक्टरच्या तपासणीमध्ये धक्कादायक प्रकार उघड

पीडित मुलीनं पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानंतर तिला वडिलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि धक्कादायक खुलासा झाला.

पीडित मुलीनं पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानंतर तिला वडिलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि धक्कादायक खुलासा झाला.

पीडित मुलीनं पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानंतर तिला वडिलांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि धक्कादायक खुलासा झाला.

मुंबई, 9 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात 13 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यावर पोटदुखीची तक्रार करू लागली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला असं पोलिसांनी सांगितलं. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

मागील अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलीला धमकावून आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता. पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड टेस्ट (Ultrasound) करण्याचा सल्ला दिला. तपासणी केल्यानंतर ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचं समोर आलं. ही बाब समजताच तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हा प्रकार समोर आल्यानंतर वडिलांनी मुलीला याबाबत विचारणा केली, तेव्हा शेजारी राहणारी व्यक्ती आपल्यावर बलात्कार करत असल्याचं तिनं सांगितलं.

या प्रकाराबाबत कुणाला सांगितलं तर आई-वडिलांसह सर्वांना ठार मारण्याची त्यानं धमकी दिली होती असंही त्या मुलीनी पालकांना सांगितलं. याबाबत मुलीचे वडिल म्हणाले, ‘ आमच्याच गावात राहणारा एक जण मुलीवर अनेक दिवसांपासून अत्याचार करत आहे. तिच्या पोटात वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात नेले. अल्ट्रासाउंड टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पोटात 2 महिन्यांचा गर्भ असल्याचं सांगितलंलं. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी मी जेव्हा पोलीस ठाण्यात गेलो तेव्हा ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्याने हुसकावून लावलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी ठाणे प्रभारींना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’

'मी एकनाथ शिंदेंचा पुतण्या'; जुगार खेळताना अटक झालेल्या शिवसेना शाखाप्रमुखाचा दावा

पोलिस अधीक्षक समर बहादूर म्हणाले, ‘अत्याचार प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातीलच एका 40 वर्षीय व्यक्तीने विविध आमिषं दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. नंतर ती गर्भवती राहिली. तक्रारीच्या आधारावर कारवाई झाली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.’

देशात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशा घटनांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. या आधी, सुरत, कठुआ, उन्नावसह महाराष्ट्रातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. भारतात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमध्ये दोषींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी जगभरात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. भारतात पोक्सो कायदा (POCSO Act) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने 2012 मध्ये हा कायदा तयार केला आहे. या कायद्यानुसार गुन्हेगाराला किमान 10 वर्ष कैद तसंच जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. या कायद्यानुसार, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Crime news, Uttar pardesh