मुंबई, 7 फेब्रुवारी : मुलं लहान असतात तेव्हा पालक त्यांची काळजी घेतात. पालक वयस्कर होतात तेव्हा मुलांनी त्यांची काळजी घेणं अपेक्षित असतं; मात्र काही मुलं असं करत नाहीत. वृद्ध पालक म्हणजे काही मुलांना ओझं वाटतात. त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात.
दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका 20 वर्षाच्या मुलानं आपल्या अपंग वडिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पीडित व्यक्तीचा मृतदेह डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला गेला होता. तेव्हा या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आनंद पर्वत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुलाला अटक करण्यात आली. 'नवभारत टाइम्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
काय आहे प्रकरण?
सेंट्रल दिल्लीच्या डीसीपी श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजता आनंद पर्वत पोलीस ठाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा कॉल आला होता. . मृत व्यक्ती जितेंद्र शर्मा यांना दोन वर्षांपासून अर्धांगवायूचा त्रास होता. त्यामुळे ते जागेवर होते. त्यांना दारूचंही व्यसन होतं, असं तपासात निष्पन्न झालं. त्यांची पत्नी वेगळी राहत होती. पेन्शन आणि भाडेकरूंकडून मिळणाऱ्या भाड्यातून घरखर्च चालायचा.
दुकानात घुसून नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण, Live Video आला समोर
मृत व्यक्तीला दारूचं व्यसन असून त्यातून त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असं पोलिसांना सुरुवातीला वाटलं होतं; मात्र शर्मा यांच्या पत्नीनं मुलावर संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी दुसऱ्या अँगलनं या प्रकरणाचा तपास सुरू केला. आपल्या मुलानेच पतीची हत्या केली असावी, असं मुलाच्या आईचं म्हणणं होतं.
ठुकरा के मेरा प्यार, लग्नमंडपात एकतर्फी प्रेमातून नवरीसोबत घडला भयंकर प्रकार
आईनं केलेले आरोप सुमित नावाच्या मुलानं नाकारले. पोलिसांनी डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. मृत व्यक्तीचा गळा दाबला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तपासादरम्यान शेजाऱ्याचा जबाब घेण्यात आला. त्याने सांगितलं की, घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तो शर्मा बाप-लेकासोबत दारू पीत बसला होता. जितेंद्र शर्मा यांनी 11 ग्लास दारू प्यायली होती. त्यानंतर पोलिसांनी सुमितची कसून चौकशी केली असता त्यानं गुन्हा कबूल केला. बेडवर लघवी केल्यानं आपण वडिलांचा खून केल्याची कबुली त्यानं दिली. पोलिसांनी आरोपी सुमित (20 वर्षं) याला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi