Home /News /crime /

जामिनावर आलेल्या आरोपीसोबतच घडलं विपरीत, व्याजाने दिले पैसे अन्...

जामिनावर आलेल्या आरोपीसोबतच घडलं विपरीत, व्याजाने दिले पैसे अन्...

खुनाच्या गुन्ह्यात हा आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो कोर्टाकडून जामिन (Accused on Bail) मिळाल्यानं बाहेर आला होता

    जळगाव, 5 जून : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी (Crime News) समोर आली आहे. जामिनावर आलेल्या एका आरोपीसोबतच हे धक्कादायक कृत्य घडले आहे. खुनाच्या गुन्ह्यात हा आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तो कोर्टाकडून  जामिन (Accused on Bail) मिळाल्यानं बाहेर आला होता. मात्र, त्याच्या अपिलावर निकाल लागण्यापूर्वीच या आरोपीचा खून झाला. काय आहे घटना ? सागर वासुदेव पाटील, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागरने आरिफ शहा अय्युब शहा याला व्याजाने पैसे दिले, अशी माहिती आरिफच्या वडिलांना दिली होती. त्यामुळे आरिफला त्याच्या वडिलांनी मारहाण केली होती. यानंतर आरिफच्या मनात सागरबद्दल संताप निर्माण आला होता. यामुळे त्याने मित्राला सोबत घेऊन दोन दिवस पद्धतीशर नियोजन केले. तसेच दारू पाजून सागरचा गेम केला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. का झाली होती जन्मठेप? चंद्रकांत उर्फ भय्या सुरेश पाटील (रा. गणेशवाडी) या अंडापाव विक्रेत्या तरुणाचा 14 मे 2015 रोजी खून झाला होता. रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणात सागर वासुदेव पाटील या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो काही दिवस कारागृहात राहिला. यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपल्या शिक्षेच्या विरोधात अपील दाखल केले होते. यानंतर त्याला खंडपीठाने 2019मध्ये जामीन दिला होता आणि यानंतर तो बाहेरच होता. दरम्यान, सागरकडून आरिफ शहा याने व्याजाचे पैसे घेतले होते. मात्र, घेतलेले पैसे परत करायला त्याला अडचणी येत होत्या. सागरला त्याने दिलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे त्याने आरिफच्या घरी दोन वेळा जाऊन वाद घातला होता. यामुळे आरिफला त्याच्या वडिलांनी मारहाणही केली होती. यामुळे आरिफच्या मनात सागरबद्दल राग आला होता. यानंतर त्याने सागरला संपविण्याचा विचार केला. त्याने त्याप्रमाणे नियोजनही केले.  धक्कादायक! माफी मागून माहेराहून परत आणलं; मग रस्त्यातच दाताने चावा घेत तोडलं पत्नीचं नाक गुरुवारी रात्री आरिफ याने त्याचा मित्र जुबेर शेख भिका सिकलिगर (वय 22, रा. मासुमवाडी) याला सोबत घेतले. तसेच सागरला दारू प्यायला बोलावले. मासळी बाजाराजवळ तिघांनी मद्यप्राशन केले. दारू चढल्याचे लक्षात आल्यानंतर सागरची दोघांनी मिळून हत्या केली. यानंतर दोघे तिथून फरार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon, Murder

    पुढील बातम्या