Home /News /crime /

क्राईम सीरियल दाखवून लेकाकडून बनवला 5 जणांच्या हत्येचा कट, दुधात विष घालून पाजलं आणि...

क्राईम सीरियल दाखवून लेकाकडून बनवला 5 जणांच्या हत्येचा कट, दुधात विष घालून पाजलं आणि...

लेकाला क्राईम सीरियल दाखवून बनवला हत्येचा भयानक कट, पोलिसही झाले हैराण

    गाजियाबाद (उत्तर प्रदेश), 21 मे : लॉकडाऊनमध्ये तिहेरी हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या हत्याकांडात एका आई-मुलाला अटक केली आहे. या मायलेकाने एकाच कुटुंबातील 5 जणांना एकत्र विष दिल्याचं समोर आलं आहे. यामध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला तर दोघेजण सुखरूप बचावल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा, तिची मुलगी एंजल आणि अनन्या अशी मृत्यू झालेल्या तिघींची नावं आहेत. रविवारी त्यांचं निधन झालं. तिघांचा विषबाधामुळे मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गाझियाबादझील बहादूरपूर गावात ही घडना घडली आहे. तर आशाचा नवरा आणि त्यांच्या मुलालाही विष देण्यात आलं होतं. पण ते यामध्ये बचावले आहेत. याप्रकरणी मृत महिलेचे पती रामेश्वर त्यागी यांनी तिची मेहुणी गीता, पुतणा विक्रांत आणि भाची प्रियंका यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. रामेश्वर त्यागी यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या नातेवाईकांनी बराच वेळा ठार मारण्याची धमकी दिली होती. पण, रामेश्वर यांच्या सांगण्यावरून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडे कोणताही ठोस पुरवा नव्हता. पोलिसांनी आधी गीता आणि मुलगी प्रियंकाची काटेकोरपणे चौकशी सुरू केली. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांनी पोलिसांना मोठा खुलासा केला. चौकशीदरम्यान गीता आपला मुलगा विक्रांतला अनेकदा 'क्राइम सीरियल' दाखवत असे. अशी सीरियल पाहिल्यानंतर गीताने विक्रांतला हत्येची योजना आखण्यास सांगितलं. या कामात प्रियंकाने तिच्या आईचेला मदत केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. टीव्हीवर 'क्राइम सीरियल' पाहिल्यानंतर विक्रांतने आपल्या आई आणि बहिणीला विष देऊन त्याच्या हत्येच्या योजनेविषयी सांगितलं. यानंतर रविवारी रात्री गीताने मुलांसह दुधात विष मिसळून आपल्या भाच्याच्या संपूर्ण कुटूंबाला विष दिलं. या मृत्यूच्या खेळात गीताचा मेहुणा रामेश्वर त्यागी बचावले आणि संपूर्ण प्रकरण उघडले. आता या प्रकरणात पोलिसांनी गीता, विक्रांत आणि प्रियांका या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या अँगलने करण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या