Home /News /crime /

धक्कादायक! गुजरातमधील कस्टम विभागातून 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचं सोनं गायब

धक्कादायक! गुजरातमधील कस्टम विभागातून 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचं सोनं गायब

गुजरातमधील (Gujrat) जामनगरमध्ये (Jamnagar) कस्टम विभागाच्या (Custom Department) कार्यालयातून 1 कोटी 20 लाखांचं सोनं गायब झालं आहे. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

पुढे वाचा ...
    गांधीनगर, 19 डिसेंबर : तामिळनाडू ( Tamil Nadu) मधील सीबीआय (CBI) कोठडीमधून 45 कोटींचं 103 किलो ग्रॅम सोनं गायब झाल्याची बातमी ताजी आहे. त्यातच सरकारी यंत्रणांना मान खाली घालवणारी आणखी एक बातमी आता समोर आली आहे. आता गुजरातमधील (Gujrat) जामनगरमध्ये (Jamnagar) कस्टम विभागाच्या (Custom Department) कार्यालयातून 1 कोटी 20 लाखांचं सोनं गायब झालं आहे. या प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कस्टम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे कर्मचारी गेल्या चार वर्षांपासून या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘आजतक’नं हे वृत्त दिलं आहे. काय आहे प्रकरण? ‘जामनगरच्या कस्टम विभागातून गायब झालेलं सोनं हे भूजच्या कस्टम ऑफिसमधील होते. भूजमध्ये 2001 साली झालेल्या भूकंपानंतर हे सर्व सोनं जामनगरच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर भूजच्या कार्यालयानं हे सोनं परत घेतलं त्यावेळी त्यांना तब्बल 1 कोटी 10 लाखांचं 2, 156.722 ग्रॅम सोनं गायब झाल्याचं आढळून आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी FIR दाखल केली आहे. कसं झालं सोनं गायब? भूजमध्ये झालेल्या भुकंपामुळे कस्टम विभागाची इमारत पडली होती. त्यानंतर त्या ऑफिसच्या कस्टडीत असलेलं 3, 149.398 ग्रॅम सोनं सुरक्षित राहावं म्हणून जामनगरच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आले होते. हे सर्व सोनं दोन सुटकेस भरुन जामनगर कस्टम विभागाच्या ऑफिसमधील कस्टडीत ठेवण्यात आले होते. भूज ऑफिसचं बांधकाम 2016 साली पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी जामनगर ऑफिसमधील सीलबंद सुटकेस ताब्यात घेतल्या. त्यावेळी त्या सुटकेसच्या किल्ल्या गायब होत्या. त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही सुटकेसची कुलपं तोडण्यात आली. त्यानंतर हे सोनं गायब झाल्याचा दावा करण्यात आला. हे सोनं चोरीला गेल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Gold, Gujrat

    पुढील बातम्या