Home /News /crime /

विनोद कांबळीच्या पैशांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला, क्रिकेटपटूला महाग पडली 'ती' चूक

विनोद कांबळीच्या पैशांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला, क्रिकेटपटूला महाग पडली 'ती' चूक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची (Vinod Kambli) सायबर गुन्हेगारांनी आर्थिक फसवणूक केल्याचं प्रकरण उघड झाले आहे.

    मुंबई, 10 डिसेंबर : फोनवर खोटी माहिती देत पैशांची फसवणूक करण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. या प्रकराच्या फोन कॉलला बळी पडू नका, याबाबत तातडीने तक्रार करा, याबाबतचे आवाहन हे सर्व बँका तसेच सायबर पोलिसांकडून नेहमी केले जाते. याबाबतच्या प्रचारानंतरही  ऑनलाईन गुन्हे (Online fraud) काही कमी झालेले नाहीत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची (Vinod Kambli) सायबर गुन्हेगारांनी आर्थिक फसवणूक केली आहे. विनोद कांबळीने याबाबत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कोणती चूक नडली? या प्रकरणात माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, 'विनोद कांबळीला एका व्यक्तीने फोन करत स्वत:  बँक अधिकारी असल्याचा दावा केला. कांबळीला  ग्राहकांची माहिती असलेला (KYC) फॉर्म भरणे आवश्यक आहे. तो फॉर्म भरण्यासाठी बँकेचे डिटेल्स  आवश्यक आहेत, अन्यथा तुमचे बँक अकाऊंट बंद होईल, असे सांगितले. तसेच एक ऑनलाईन लिंक देखील पाठवली. कांबळीने ती लिंक ओपन करताच त्याच्या खात्यामधील 1 लाख 14 हजार रूपये त्या व्यक्तीने काढून घेतले. विनोद कांबळीने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार करताच त्यांनी याची तातडीने दखल घेतली. वांद्रे पोलिसांनी सायबर शाखेच्या मदतीने कांबळीच्या खात्यामधील रक्कम परत मिळवली आहे. सिम अपडेट करायचं सांगून SBI मधून तब्बल 10 लाखांची चोरी, निवृत्त अधिकारी सायबर क्राईमला पडले बळी 'हा अतिशय दुर्दैवी प्रकार होता. या प्रकराच्या घटना सध्या वाढत आहेत. मला सुदैवाने पैसे परत मिळाले, पण अनेक व्यक्तींना त्यांचे पैसे परत मिळत नाहीत. मी या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत समाधानी आहे. तसेच याबाबत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे,' अशी प्रतिक्रिया कांबळीने 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Online fraud, Vinod kambli

    पुढील बातम्या