Home /News /crime /

बापरे! शेजारीच उठले एकमेकांच्या जीवावर!; क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांनी वार; एकाचा मृत्यू

बापरे! शेजारीच उठले एकमेकांच्या जीवावर!; क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांनी वार; एकाचा मृत्यू

यात एकाचा मृत्यू झाला आहे तर आठ जणांना दुखापत झाली आहे.

    संभल (उत्तर प्रदेश), 30 ऑगस्ट: नातेवाइकांपेक्षाही कोणतं सर्वात जवळचे आणि अडचणींच्या वेळी सर्वात आधी धावत येणारे कोणी लोकं असतील ते म्हणजे शेजारी. अनेक ठिकाणी शेजारी खूप गुण्यागोविंदानं नांदतात. मात्र उत्तर प्रदेशातील (UP News) संभलमध्ये (Sambhal) भलताच प्रकार घडला आहे. शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि फ्रीस्टाईल हाणामारी (Crime News) झाली. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर आठ जणांना दुखापत झाली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यांपूर्वी झालेल्या पावसादरम्यान खेमकरन यांच्या घराची भिंत कोसळली होती. खेमकरन यांनी शेजारी जगदीशवर मुद्दाम भिंत पाडल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरून दोघांमध्ये बराच वाद झाला. आजूबाजूच्या लोकांच्या हस्तक्षेपावरून दोघेही शांत झाले पण घराची भिंत दोघांमध्ये वाद होण्याचं कारण ठरलं. हे वाचा - भाजीविक्रेत्याचा सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला, हाताची 3 बोटं छाटली रविवारी अचानक या दोन कुटुंबांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. थोड्याच वेळात दोन्ही बाजूचे अधिक लोक जमले आणि मारामारीनंतर लाठ्या आणि धारदार शस्त्रांचा वापर सुरू झाला. या संघर्षात जगदीश याच्या कुटुंबातील महिलाही सामील झाल्या आणि जखमी झाल्या. दुसऱ्या बाजूला खेमकरन, फुलवती, हरप्यारी, सोनभद्र आणि नथू हेही जखमी झाले. यात्रा जगदीशला प्रचंड मार लागला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी संपूर्ण गावामध्ये बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणात खेमकरन याच्यासोबत इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Crime news, Uttar pardesh

    पुढील बातम्या