मुंबई, 2 जुलै : एका 30 वर्षांच्या महिलेला नोकरी देण्यासाठी दिल्लीला (Delhi) बोलवण्यात आले. त्यानंतर तिला विमानानं ओमानमध्ये (Oman) पाठवण्यात आले. या महिलेला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलण्यात आल्याचा आरोप तिच्या पतीनं केला आहे. या प्रकरणात त्यानं दिल्ली पोलिसांना तक्रारही केली पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा त्यानं केला असून आता दिल्ली हायकोर्टात मदतीची याचिका दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार ही महिला बिहारची असून सध्या गर्भवती असल्याचं तिच्या नवऱ्यानं सांगितलं आहे. या प्रकरणातील उघड झालेल्या माहितीनुसार, '10 एप्रिल रोजी या महिलेला एक फोन आला होता. त्यामध्ये दिल्लीतील पहाडगंज भागातील हॉटेलमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली होती. 29 मे रोजी ही महिला रेल्वेनं दिल्लीमध्ये पोहचली. त्यावेळी आपण सुरक्षित असल्याचं तिनं नवऱ्याला फोन करून सांगितलं. त्यानंतर महिलेचा फोन कव्हरेजच्या बाहेर आहे.'
महिलेच्या नवऱ्यानं 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, '8 जून रोजी आपल्याला पत्नीचा ऑडिओ मेसेज आला. त्यामध्ये तिने आपण ओमानमध्ये असून 10 अन्य मुलींसोबत डांबुून ठेवण्यात आल्याचं सांगितलं. आपल्याला जनावरांसारखी वागणूक देत असल्याचंही पीडित महिलेनं नवऱ्याला सांगितले. त्यानंतर पीडित महिलेच्या नवऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यावेळी त्याला दिल्लीचं प्रकरण असल्यानं दिल्लीत तक्रार करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार त्यानं दिल्लीच्या पहाडगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पण त्यामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.'
पोलीस कारवाईतून वाचल्याच्या आनंदात हवेत गोळीबार; चौघांची थेट तुरुंगात रवानगी
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पीडित महिलेच्या नवऱ्यानं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये आपल्या पत्नीला वेश्या व्यवसायात बळजबरीनं ढकललं असल्याचा संशय त्यानं व्यक्त केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तक्रार मिळूनही कोणतीही एफआयआर दाखल केली नसल्याचा दावा त्याचे वकील लोकेश अहलावात यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.