दाम्पत्यात झालं कडाक्याचं भांडण, पत्नी माहेरी गेल्यानं पतीनं कापलं स्वत:चं गुप्तांग

दाम्पत्यात झालं कडाक्याचं भांडण, पत्नी माहेरी गेल्यानं पतीनं कापलं स्वत:चं गुप्तांग

देवीला पतीपासून काडीमोड हवी होती. त्यात 31 डिसेंबरला बाबू दारू पिऊन घरी आला. देवी आणि त्याच्यात कडाक्याचे भांडण झाले.

  • Share this:

चेन्नई, 2 जानेवारी: कौंटुबिक वाद आता तर जवळपास प्रत्येक घरात सुरू असतात. मात्र, चेन्नईत पती-पत्नीच्या वादातून एक विचित्र घटना घडली आहे. पत्नी भांडण करून माहेरी निघून गेल्याच्या रागातून पतीने स्वत:चं गुप्तांग कापून घेतल्याचे घटना समोर आली आहे. वॉशरमेनपट भागात 31 डिसेंबरला ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चेन्नईच्या वॉशरमेनपट भागात राहणारे बाबू (वय-40) आणि देवी (वय-35) असे दाम्पत्याचे नाव आहे. बाबूला दारूचं वेसन आहे. देवीला पती दारू पित असल्याचे आवडत नव्हते. त्यावरून दोघांमध्ये कायम वाद होत होते. देवीला पतीपासून काडीमोड हवी होती. त्यात 31 डिसेंबरला बाबू दारू पिऊन घरी आला. देवी आणि त्याच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे देवी माहेरी निघून गेली. नाराज झालेल्या बाबूने किचनमध्ये जाऊन चाकूने स्वत: चं गुप्तांग कापून घेतले. त्यांच्या किंचाळ्या ऐकून शेजारच्यांनी धाव घेतली असता बाबू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दाम्पत्याला अपत्य नाही.

छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह...

मुंबईतील विद्याविहार इथं सोमवारी एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असल्याने अजूनही या महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांना जेव्हा सोमवारी या महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिचा एका पाय गायब होता. आता एका नाल्यामध्ये हा पायाचा तुकडा सापडला आहे.

पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटू शकली नाही. विद्याविहारमधील नवल गेटसमोर सोमवारी एका महिलेचा बेडशीटमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह नजरेस आल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी याबाबतची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली होती.

पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसंच नंतर या मृतदेहाचा पंचनामाही करण्यात आला. सध्या पोलीस घाटकोपरमधील विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी झाली. हत्येनंतर आरोपीने हा मृतदेह घाटकोपरमध्ये आणून फेकला.

'सगळ्यात आधी मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही गायब असणाऱ्या लोकांची यादी तपासून पाहात आहोत,' अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 02:11 PM IST

ताज्या बातम्या