मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! साखरपुडा मोडल्याने भडकली मुलगी; तरुणाचं अपहरण केलं अन् मग...

धक्कादायक! साखरपुडा मोडल्याने भडकली मुलगी; तरुणाचं अपहरण केलं अन् मग...

आपलं लग्न व्हावं म्हणून, आपलं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून अनेक जण अगदी काहीही करायला तयार होतातच पण त्याचा परिणाम दर वेळेस चांगलाच होतो असं नाही.

आपलं लग्न व्हावं म्हणून, आपलं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून अनेक जण अगदी काहीही करायला तयार होतातच पण त्याचा परिणाम दर वेळेस चांगलाच होतो असं नाही.

आपलं लग्न व्हावं म्हणून, आपलं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून अनेक जण अगदी काहीही करायला तयार होतातच पण त्याचा परिणाम दर वेळेस चांगलाच होतो असं नाही.

    मुंबई,9 जुलै-   आपलं लग्न व्हावं म्हणून, आपलं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून अनेक जण अगदी काहीही करायला तयार होतातच पण त्याचा परिणाम दर वेळेस चांगलाच होतो असं नाही. उत्तर प्रदेशात तर एका मुलीने ज्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, त्या मुलाचंच अपहरण केलं (Girl Kidnap Boy For Wedding). अर्थात पोलिसांनी केवळ चार तासांतच हे अपहरणनाट्य उघडकीला आणलं आणि दोन जणांना अटक (Police Arrests Two People) केली. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेशात बिजनौरमध्ये (Bijnour,UP) हे नाट्य घडलं. बिजनौरमधल्या प्रियांकाचं अंकुर कुमारशी लग्न ठरलं होतं. घरच्यांच्या संमतीने या दोघांचा 14 मे 2021 रोजी साखरपुडाही झाला. अंकुर स्टेनो म्हणून काम करतो. कोणत्याही लग्न ठरलेल्या जोडप्याप्रमाणे अंकुर आणि प्रियांकाही फोनवर गप्पा मारायचे; पण याचदरम्यान अंकुरला प्रियांकाच्या काही गोष्टी खटकल्या आणि त्यानं प्रियांकासोबतचं लग्न मोडलं; पण प्रियांका मात्र अंकुरच्या प्रेमात पडली होती. कोणत्याही परिस्थितीत प्रियांकाला अंकुरशीच लग्न करायचं होतं; पण अंकुरही आपल्या निर्णयावर ठाम होता. हट्टाला पेटलेल्या प्रियांकाने अखेर भावाच्या मदतीने अंकुरच्या अपहरणाचा डाव रचला. बिजनौरच्या स्याऊ परिसरात कोर्टात अंकुर स्टेनो म्हणून काम करतो. गुरुवारी (7 जुलै) सकाळी 10च्या सुमारास अंकुर आपल्या घरून बाइकवरून ड्युटीवर जात होता. त्याचदरम्यान प्रियांकाने तिच्या भावाबरोबर अंकुरला किडनॅप (Girl Kidnap Boy For Wedding) केलं. बंदुकीचा धाक दाखवून अंकुरला किडनॅप करण्यात आलं; पण प्रियांकाच्या दुर्दैवाने पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे आणि वेगाने केलेल्या हालचालींमुळे फक्त चार तासांतच हे अपहरणनाट्य उघडकीला आलं. (हे वाचा: 15 वर्षाच्या मुलाचे सातवीतील मुलीशी प्रेमसंबंध, सहा महिन्यांनी धक्कादायक माहिती समोर ) बिजनौर पोलिसांनी प्रियांका, तिचा भाऊ आणि त्याच्या मित्राला अटक केल्याची माहिती आहे. या तिघांवरही अंकुरचं अपहरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अपहरण केल्यानंतर हे तिघे जण अंकुरला मंदिरात नेण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती अंकुरने पोलिसांना दिली. मंदिरात नेऊन आपल्यासोबत अंकुरचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्याचा प्रियांकाचा प्रयत्न होता. लग्न न केल्यास अंकुरला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती; पण पोलिसांमुळे हे यशस्वी झालं नाही.कोणत्याही परिस्थितीत लग्न करायचंच असं प्रियांकांने ठरवलं होतं. त्यासाठी लग्नाची साडीही तिने आपल्यासोबत आणली होती. काहीही झालं तरी अंकुरला सोडायचं नाही यासाठी तिनं पूर्ण तयारी केली होती; पण पोलिसांनी आपलं कर्तव्य चोख बजावून अंकुरची सुटका केली.
    First published:

    Tags: Crime news, Uttar pardesh

    पुढील बातम्या