लुडो खेळण्याच्या वादातून 14 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

लुडो खेळण्याच्या वादातून 14 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

14 वर्षीय मुलाच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात.

  • Share this:

सचिन जिरे (प्रतिनिधी)औरंगाबाद, 08 नोव्हेंबर: खेळण्यातून झालेल्या वादामधून 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लुडो खेळ खेळण्यामधून मित्रांमध्ये झालेल्या वादामधून मुलाची दोरीनं गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गुदम या गावातील घटना समोर आली आहे.

गुरं चरायला घेऊन जाताना गुराखी आणि काही मुलं लुडो खेळ सोबत घेऊन गेली. त्यांनी पैसे लावून लुडो खेळण्यास सुरुवात केली. खेळादरम्यान पैशांमधील देवाणघेवाणीवरुन बाचाबाची झाली. त्याचा राग मनात ठेवून 14 वर्षीय मुलाचा आधी गळ आवळून डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा केला असून पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

संशयी नवऱ्याने केली पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या

संशयाने विनाश होतो असं म्हणतात. त्याचा अनुभव रायगडमधील माणगाव तालुक्यात आला. एका संशयी नवऱ्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडालीय. ही धक्कादायक घटना माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली आहे. संतोष शिंदे असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केलीय. पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत असून संतोषच्या चौकशीतून नेमकं कारण शोधून काढू असा दावा पोलिसांनी केलाय. या खळबळजनक घटनेनं दहिवली गाव हादरून गेलं असून या कुटुंबाला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.संतोष शिंदे हा पत्नी सुहानी (36) आणि दोन मुलांसह दहिवली गावात काही वर्षांपासून राहत होता. छोटी मोठी काम करून तो आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवत असे. संतोष शिंदे हा संशयी होता. त्यामुळे त्याचं आणि त्याची पत्नी सुहानाचं भांडण होत असे. त्यांचं कायम भांडण होत असल्याने त्यांच्यात कायम तणावाचं वातावरण होतं. या भांडणाची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनाही होती.

वारंवार होणाऱ्या या भांडणामुळे संतोष हा आणखीच संशयी बनता त्यांचं आणि त्याच्या पत्नीची टोकाची भांडणं होऊ लागली. घटनेच्या दिवशीही त्याचं आणि पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं होतं. रात्री पत्नी आणि मुलं झोपल्यावर त्याने रागाच्या भरात नायलॉनच्या दोरीने आधीचा पत्नीचा गळा आवळला आणि नंतर दोन मुलांचीही गळा आवळून हत्या केली. पवन शिंदे (5) आणि संचित शिंदे (2) अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. किरकोळ वादातून संतोषने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

55 वर्षांचा तो 19 वर्षीय युवतीला दररोज छेडायचा, महिलांनी चोप देत काढली धिंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या