मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

KBC च्या नावावर 90 लाखांचा फ्रॉड; अशी करायचा नागरिकांची फसवणूक

KBC च्या नावावर 90 लाखांचा फ्रॉड; अशी करायचा नागरिकांची फसवणूक

पोलिसांनी या प्रकरणात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

    रांची, 25 फेब्रुवारी : सीआयडीने (CID) तब्बल 90 लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणात आरोपीला ओडिशात अटक केली आहे. आरोपीने कौन बनेगा करोडपतीच्या जॅकपॉटचं बक्षीस देण्याच्या नावाखाली हा गुन्हा केला. हा गुन्हा 2018 मध्ये सीआयडी रांचीच्या सायबर सेलमध्ये दाखल झाला होता. 90 लाख रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणात जन्मजय दास (44 ) याला ओडिशाहून अटक केली आहे. आरोपीने यापूर्वी छत्तीसगड आणि देहरादून येथेही सायबर फसवणूक केली आहे. हा आरोपी या गुन्ह्याअंतर्गत विविध वर्च्युअल नंबरवरुन लोकांना इंटरनेट कॉल करीत होता आणि त्यांना केबीसी जॅकपॉटमध्ये विजेता होण्याचं आश्वासन दिलं जात होतं. केबीसीमध्ये पुढे खेळण्यासाठी आणि अधिक पैसे जिंकण्यासाठी लोकांना प्रश्न विचारत होता. यानंतर जिंकलेल्या पैसे मिळवण्यासाठी जीएसटी आणि अन्य चार्जच्या नावाखाली विविध बँक खात्यात धोका देऊन पैसे जमा करण्यास सांगत होता. हे ही वाचा-औरंगाबादेत सराफाला दिवसाढवळ्या लुटलं, सिनेस्टाईल पाठलाग करत पळवली सोन्याची बॅग या प्रकरणात सीआयडीने अपील केली आहे की, कोणत्याही अज्ञात मोबाइल नंबरवरुन केबीसी जॅकपॉटच्या नावाखाली कॉल आल्यास स्वत:चे खासगी माहिती शेअर करू नये. केबीसीच्या नावाखाली कोणतेही कॉल आले तर केबीसीचं ऑफिस वा वेबसाइटवर जाऊन खात्री करू घ्या. लॉटरीच्या नावाखाली येणाऱ्या कॉलच्या जाळ्यात सापडू नका.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Financial fraud

    पुढील बातम्या