कॉक्स अ‍ॅण्ड किंग घोटाळा प्रकरणाला धक्कादायक वळण, 'त्या' मृतदेहाची ओळख पटली

कॉक्स अ‍ॅण्ड किंग घोटाळा प्रकरणाला धक्कादायक वळण, 'त्या' मृतदेहाची ओळख पटली

ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तिथून दीड किलोमीटरवर सागर यांची कार पोलिसांना सापडली आहे.

  • Share this:

टीटवाळा, 18 ऑक्टोबर : कॉक्स अ‍ॅण्ड किंग घोटाळा प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.  कल्याण जवळील टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर या मृतदेहाची ओळख पटली असून कॉक्स अॅण्ड किंगमध्ये काम करणारे चार्टड अकाऊंटट सागर देशपांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रव्हॅल्स कंपनी असलेल्या कॉक्स अ‍ॅण्ड किंगमध्ये 20 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. बेपत्ता असलेल्या सागर देशपांडे यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. 11 ॲाक्टोबरपासून  सागर देशपांडे हे बेपत्ता  झाले होते. शनिवारी रात्री  टिटवाळा रेल्वे स्टेशन हद्दीत 12 तारखेला  एक मृतदेह आढळून आला होता. अखेर या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह ठाणे येथील रहिवासी असलेल्या चार्टड अकाऊंट सागर देशपांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेलिकॉप्टरमधून उतरताच शरद पवारांनी पहिले कार्यकर्त्यांना बजावले, पाहा हा VIDEO

ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तिथून दीड किलोमीटरवर सागर यांची  कार पोलिसांना सापडली आहे. दरम्यानस ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास कल्याण रेल्वे पोलिसाकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दुल वाल्मिक यांनी सांगितले.

टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर 12 ऑक्टोबर रोजी एका तरुणाचा मृतदेह सापडल्या नंतर रेल्वे पोलिसांनी राज्यभर या तरुणाचे फोटो पाठवून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर ठाण्यातील नवापाडा पोलीस ठाण्यात 11ऑक्टोबर पासून गायब असलेल्या सागर देशपांडे याचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

11 ऑक्टोबर रोजी सागर यांनी टिटवाळ्यात कामानिमित्त जात असल्याचे सांगत घरातून निघाले होते. मात्र, ते परतलेच नसल्यामुळे घरच्यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, सागर हे कॉग्स अँड किंग या मोठ्या कंपनीत सीए म्हणून काम करत होते. तर एका प्रकरणात मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी सुरू होती. 13 तारखेला सागराला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांच्या मृत्यू झाल्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या असा संशय व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Published by: sachin Salve
First published: October 18, 2020, 10:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading