बहराइच, 27 मार्च : विज्ञानाच्या प्रगतीने माणूस चंद्रावर पोहचला आहे. मात्र, अजूनही समाजातील काही लोक अद्धश्रद्धेला बळी पडत आहेत. अशाच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तांत्रिकाच्या प्रभावाखाली येवून चुलत भावाने 10 वर्षांच्या निष्पापाचा बळी दिला. तरुणाने निर्दयीपणे चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकून दिला. आरोपीचा मुलगा कधीही बेशुद्ध पडत होता. त्याच्या उपचारासाठी तांत्रिकाने बळी देण्यास सांगितले. मृताच्या चुलत भावाशिवाय पोलिसांनी त्याच्या काकालाही अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण नानपारा कोतवाली भागातील परसा गावातील आहे. जिथे 23 मार्च रोजी संध्याकाळी 10 वर्षीय निष्पाप विवेक वर्माचा मृतदेह पोलिसांना गव्हाच्या शेतात सापडला होता. बहराइचचे पोलीस अधीक्षक प्रशांत वर्मा यांनी सांगितले की, मृतदेह पाहून विवेकचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृत विवेकचे वडील किशून यांच्या तक्रारीवरून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
वाचा - 80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ, डॉक्टराचा लॅपटॉप दुरस्तीतला गेला आणि....
तंत्र-मंत्राच्या प्रकरणातून खून
पोलिसांच्या तीन दिवसांच्या तपासात निष्पाप विवेकचा मृत्यू तंत्र-मंत्रामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. किशूनचा पुतण्या अनूपचा मुलगा अनेकदा आजारी होता. त्याला शुद्ध हरपण्याचा आजार होता. अनूप हा त्याच्या मुलाच्या आजाराबाबत दुसऱ्या गावात राहणाऱ्या जंगली तांत्रिकाच्या संपर्कात होता. तांत्रिकाने अनूपला कोणाचा तरी बळी देण्याबाबत सांगितले.
तिन्ही आरोपींची कारागृहात रवानगी
आरोपी अनूप तांत्रिकाच्या प्रभावाखाली आला. त्याला त्याचं म्हणणे खरे वाटू लागले आणि त्याने त्याच्या 10 वर्षाच्या चुलत भाऊ विवेकची हत्या केली. पोलिसांनी अनूप आणि त्याचा सहाय्यक काका चिंताराम आणि तांत्रिक यांना अटक केली आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून तिन्ही आरोपींना कारागृहात पाठवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime