जुन्नर, 28 जुलै : शेतातील रस्त्याने ट्रॅक्टर नेला म्हणून चुलत भावानेच चुलत भावाच्या पोटात सुरी खुपसून आणि हाताच्या दंडावर मारून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना जुन्नरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
विशाल ज्ञानेश्वर मेहेर (राहणार वारुळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव असून याबाबतची फिर्याद महेश सुरेश मेहेर (वय 33) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नात्याने चुलत-चुलत भाऊ असून 26 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास वारुळवाडी येथील पाण्याचे टाकी जवळ फिर्यादी महेश मेहेर हे आपल्या शेतामध्ये काम करीत होते. त्यावेळी आरोपी विशाल मेहेर हा ट्रॅक्टर घेऊन येत होता. त्यावेळी महेश यांनी 'तू आमचे मालकीच्या रस्त्याने ट्रॅक्टर का आणलास?' असे विचारले असता आरोपी विशाल अंगावर धावून आला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
तीन बायका फजिती ऐका! 3 महिलांसोबत संसार पडला महागात, असा झाला पर्दाफाश
त्यानंतर संतापलेल्या विशासने 'आता तुला एकदाचा खल्लास करतो' असे म्हणून त्याने खिशातील सुरी बाहेर काढून महेशच्या पोटात खुपसली आणि पुन्हा डाव्या हाताच्या दंडावर मारून गंभीर दुखापत केली.
रक्तबंबाळ अवस्थेत महेश जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी विशालने घटनास्थळावरून पळ काढला. शेतातील इतर गावकऱ्यांनी महेशला तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
'एक दूजे के लिये' म्हणत राहत होते एकत्र; पण घडले असे की, सारिकाचा चिरला गळा!
महेश याने नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विनय झिंजूरके करत आहेत.