सार्वजनिक ठिकाणी ‘ती’ मुलांना पाहून अश्लील इशारे करत होती, पाहा पुढे काय झालं...

सार्वजनिक ठिकाणी ‘ती’ मुलांना पाहून अश्लील इशारे करत होती, पाहा पुढे काय झालं...

एका 30 वर्षाच्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी उघडपणे अश्लील कृत्य (Obscene Acts At Public Place) करणे चांगले महाग पडले आहे.

  • Share this:

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) 5 मार्च : बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बागा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणे हा अनेक शहरांमधील एक प्रश्न आहे. एका 30 वर्षाच्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी उघडपणे या प्रकारचे कृत्य (Obscene Acts At Public Place) करणे चांगले महाग पडले आहे. कोर्टानं या महिलेला जेल आणि आर्थिक दंड अशी कारवाई केली असून हे प्रकरण आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालं आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) येथील हे प्रकरण आहे. येथील कोर्टानं (Muzaffarnagar Court) बुधवारी या प्रकरणातील एका महिलेला दोन दिवसांची जेल आणि पाच हजार रुपयांचा आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मुजफ्फरनगर कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुमार सिंह यांनी हा निर्णय दिला.

या महिलेनं 5 हजार रुपयांचा दंड वेळेत भरला नाही तर तिला आणखी सात दिवस जेलमध्येच राहावं लागणार असल्याचं देखील न्या. सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रकरणाबाबत सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या या महिलेला 25 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हा पोलिसांनी रंगे हाथ अटक केली होती. ही महिला अश्लील इशारे करुन मुलांना बोलवत असतानाच घटनास्थळावरुन पोलिसांनी तिला अटक केली होती.

( वाचा : Love Jihad: हिंदू असल्याचं सांगत तरुणानं केले लैंगिक अत्याचार, 5 वर्षांनी प्रकार उघडकीस आला तेव्हा )

या महिलेवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 294 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर जवळपास पाच वर्षांनी हा निर्णय देण्यात आला आहे. देशामध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे हे बेकायदेशीर आहे. त्याच कायद्याचा आधार घेत या महिलेवर खटला दाखल करण्यात आला होता.

Published by: News18 Desk
First published: March 5, 2021, 6:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या