अकोला, 18 मार्च: काही दिवसांपूर्वी अकोल्यातील (Akola) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली होती. येथील एका क्रीडा प्रशिक्षकानं संघातून काढून टाकण्याची धमकी देत ( threat to drop from team) अल्पवयीन मुलींसोबत किळसवाणं कृत्य केलं होतं. पीडित मुलींवर आरोपीनं वारंवार लैंगिक अत्याचार (Sport teacher raped minor girl) केल्यानं एक मुलगी गर्भवती (Minor girl became pregnant) राहिली होती. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयानं आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला असून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावली आहे. याचबरोबर त्याला तीन लाख 10 हजारांचा दंडही ठोठावला आहे. शुद्धोधन सहदेव अंभोरे असं शिक्षा झालेल्या दोषीचं नाव आहे. आरोपी अंभोरे हा अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान स्पोर्ट खेळण्यासाठी येणाऱ्या मुलींना टीममधून काढून टाकण्याची धमकी देत आरोपी त्यांचं लैंगिक शोषण करत होता.
हेही वाचा-PUBG खेळताना प्रेम; प्रियकराला भेटण्यासाठी विवाहित प्रेयसीने ओलांडली 'सीमा' पण..
मागील बऱ्याच काळापासून त्याचा हा किळसवाणा प्रकार सुरू होता. वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानं एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी 30 जुलै 2018 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंभोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासणीअंती हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2)(एन) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 3, 4, 5 नुसार नराधम आरोपी अंभोरे याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अन्य एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि कलम 506 नुसार दोन वर्षांचा अतिरिक्त कारावास सुनावण्यात आला आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीला तीन लाख 10 हजाराचा दंड देखील ठोठावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Rape on minor