Home /News /crime /

विचित्र प्रकरण! मेंढीवर आहे महिलेच्या हत्येचा आरोप; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा

विचित्र प्रकरण! मेंढीवर आहे महिलेच्या हत्येचा आरोप; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मेंढीवर एका महिलेच्या हत्येचा आरोप आहे. मेंढीने महिलेवर हल्ला केल्याने ती जबर जखमी झाली आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मेंढीला अटक करून न्यायालयात हजर केलं

    नवी दिल्ली 26 मे : जगाच्या अनेक भागांमध्ये अशा गोष्टी घडतात की तुम्ही त्याबद्दल विचारही केलेला नसते. सध्या अशीच एक घटना दक्षिण सुदान देशातून सोर आली आहे. हत्येच्या अतिशय क्रूर आणि हादरवून टाकणाऱ्या घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्याही असतील. मात्र, आज समोर आलेली घटना अतिशय अजब आहे. यात न्यायालयाने एका मेंढीला हत्येसाठी (Sheep Killed a Woman) दोषी ठरवले आणि तिला तीन वर्षांसाठी तुरुंगात पाठवलं (Court Sentenced 3 Years Jail Punishment to Sheep). Bhiwandi Crime: भात शिजवण्यावरुन राडा; राक्षसी नवऱ्याने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करत पाडला रक्ताचा सडा मेंढीवर एका महिलेच्या हत्येचा आरोप आहे. मेंढीने महिलेवर हल्ला केल्याने ती जबर जखमी झाली आणि नंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मेंढीला अटक करून न्यायालयात हजर केलं, तिथून तिची कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणात मेंढीच्या मालकाला दोषी ठरवलं नाही. मात्र, त्यालाही मृत महिलेच्या कुटुंबीयांना 5 गाई देण्याची शिक्षा सुनावली. रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण दक्षिण सुदानच्या रुम्बेक ईस्ट काउंटीमधील आहे. या घटनेत मेंढीने महिलेवर हल्ला केला. यानंतर महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मेंढी महिलेला आपल्या डोक्याने धक्का देत खाली पाडत राहिली. मेंढीच्या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली आणि तिची अनेक हाडे फ्रॅक्चर झाली. नंतर उपचारादरम्यानच महिलेचा मृत्यू झाला. एड्यू चॅपिंग असं या महिलेचं नाव असून तिचं वय चाळीस वर्षे होतं. महिलेच्या मृत्यूनंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. बॅट, तवा, काठीने दररोज बेदम मारहाण करायची बायको; वैतागलेल्या प्रिन्सिपल नवऱ्याने अखेर...; CCTV मध्ये भयानक दृश्य कैद पोलिसांनी मेंढीला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. न्यायालयाने मेंढीला शिक्षा सुनावली. आता या मेंढीला तीन वर्ष मिल्ट्री कॅम्पमध्ये बंद राहावं लागेल. कोर्टाने हत्येच्या या प्रकरणात मेंढीच्या मालकाला दोषी ठरवलं नाही. मात्र त्यालाही शिक्षा देण्यात आली. कोर्टाने त्याला दंड ठोठावत सांगितलं की मृत महिलेच्या कुटुंबीयांनी भरपाई म्हणून 5 गाई दे. याशिवाय आपली शिक्षा पूर्ण करून मेंढी जेव्हा तुरुंगातून बाहेर येईल, तेव्हा ही मेंढीही मृत महिलेच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. कारण तिथल्या नियमानुसार, जर एखाद्या प्राण्याने एखाद्या व्यक्तीची हत्या केली, तर त्याची नुकसान भरपाई म्हणून पीडिताच्या कुटुंबालाच हा प्राणी दिला जातो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या