मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा शेवट वाईट, जेलमध्ये मफलरने घेतला गळफास,पंढरपुरातील घटना

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा शेवट वाईट, जेलमध्ये मफलरने घेतला गळफास,पंढरपुरातील घटना


सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता.

पंढरपूर, 16 ऑगस्ट : लैंगिक अत्याचार प्रकरणात ( sexual assault case ) न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास ( commits suicide in jail ) घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेने पोलीस दलासह तालुक्यात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील तानाजी किसवे (वय 21) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. तानाजी याच्यावर लैंगिक अत्याचारासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. सुनीलवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोस्को गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याला  मंगळवेढा कारागृहात ठेवण्यात आले होते.  मंगळवेढा न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्यामुळे त्याला सब जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुनील तानाजी किसवे याच्यावर पोस्को अंतर्गत गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तो सध्या मंगळवेढा येथील सब जेलमध्ये होता. रात्री जेवणानंतर आरोपीची हजेरी घेत असताना एक आरोपी कमी असल्याचे समोर आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जेलमध्ये पाहणी केली असता  सुनीलने चार कोठडीच्या बाजूला ट्रेझरीच्या बोळात मफलरच्या साह्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. (पतीचा राग पोटच्या मुलींवर काढला; 3 लेंकींना विष देऊन आईने घेतला क्रूर बदला) या घटनेची खबर तात्काळ त्याच्या नातेवाईकाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. तात्काळ अधिकारी आणि नातेवाईक घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर सुनीलचा मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. परंतु, अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत शविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. या प्रकरणी जेल प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
First published:

पुढील बातम्या