Home /News /crime /

मुलांच्या मदतीनं सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याला न्यायलयाचा दणका

मुलांच्या मदतीनं सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याला न्यायलयाचा दणका

विवाहितेनं आपला डॉक्टर सासरा विशिष्ट प्रकराचे इंजेक्शन देऊन बलात्कार करत असल्याची तक्रार केली होती. यानंतर आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) सासऱ्याला दणका दिला आहे.

    मुंबई 15 फेब्रुवारी : विवाहितेनं आपला डॉक्टर सासरा विशिष्ट प्रकराचे इंजेक्शन देऊन बलात्कार करत असल्याची तक्रार केली होती. यानंतर आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) सासऱ्याला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलेवर बलात्कार करण्यासाठी तिचा पती आणि दीरदेखील सासऱ्याची मदत करत होते. या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्जदेखील न्यायालयानं फेटाळला आहे. महिलेनं केलेल्या तक्रारीनुसार, 2019 मध्ये तिचा विवाह ठरला. यानंतर सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांवर हुंड्यासाठी प्रचंड दबाव आणला. वडिलांनी पैसे जमा करून सासरच्या लोकांना 20 लाख रूपये दिले आणि त्यानंतर त्याच वर्षी 8 जुलैला पीडितेचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर तिला आपला पती नपुंसक असल्याचे समजले. यानंतर आणखी हुंड्याची मागणी करत सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. 22 जानेवारी रोजी दीर, पती आणि सासरा तिच्या खोलीत गेले. पती आणि दीराने तिला धरून ठेवलं आणि सासऱ्यानं जबरदस्तीनं तिला एक इंजेक्शन दिलं आणि तिच्यावर बलात्कारही केला. या घटनेनंतर महिन्याभरानं सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवलं आणि जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत तिला घरात घेणार नसल्याचं सांगितलं. यानंतर या सर्व गोष्टींना कंटाळून महिलेनं जून 2020 मध्ये पोलिसांत तक्रार दिली. न्यायाधीश कोतवाल यांनी याप्रकरणावर सुनावणी करताना म्हटलं, की पीडितेनं एफआयआर नोंदवण्यास उशीर केला म्हणून तिचे आरोप खोटे आहेत असं म्हणता येणार नाही. यासाठी विलंब का झाला, याच उत्तर संबंधित महिला देऊ शकते. महिलेनं केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्यानं त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याविषयी आरोपींची चौकशी गरजेची असल्यानं त्यांना या टप्प्यावर संरक्षण देता येणार नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Rape, Rape case

    पुढील बातम्या