नवी दिल्ली 21 डिसेंबर : बॉक्सिंग मॅचच्या (Boxing Match) वादादरम्यान एका महिलेनं आपल्याच मुलीला मारहाण (Mother Beat Daughter) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ब्रिटनच्या बॉलिंगटन शहरातील असून वाद एंथोनी जोशुआ बॉक्सिंग मॅचवरुन झाला होता. 39 वर्षाच्या थेरेसा कॅरोल हिने आपली 19 वर्षाची मुलगी चँटेल कॅरोल हिला मागील वर्षीच आपल्या घरात येण्यास मनाई केलेली होती. महिलेनं आपल्या मुलीचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारलं होतं, यात मुलीच्या नाकाला दुखापत झाली होती.
22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेने नाशिकमध्ये खळबळ
द सनच्या वृत्तानुसार, ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ब्रिटनमध्ये कोरोनामुळे कडक नियम लागू होते. यावेळी ही आई आणि मुलगी ब्रिटनच्या बोलिंगटन शहरात राहात होत्या.. यावेळी इथे टियर 2 नियम लागू होते. म्हणजेच एकाच घरात राहूनही कोणतीही व्यक्ती एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत.
या प्रकरणात तीन मुलांची आई असलेल्या थेरेसाने स्टॉकपोर्ट मजिस्ट्रेट समोर याप्रकारचा हल्ला केल्याचं मान्य केलं. यानंतर कोर्टाने तिला एक वर्ष आपल्या मुलीला न भेटण्याचे आदेश दिले. ही घटना मागील वर्षी 12 डिसेंबरला घडली. यावेळी एंथोनी जोशुआ बॉक्सिंग मॅच पाहण्यासाठी महिलेनं आपल्या मैत्रिणींना घरी बोलावलं आणि भरपूर गोंधळ घातला. संपूर्ण दिवसभर हॉटेलमध्ये काम करून मुलगी घरी आली तेव्हा हे पाहून तिला राग आल की कोरोनाचे एवढे कडक नियम मोडून घरात हा प्रकार सुरू आहे.
मुलीनं जाब विचारताच महिलेनं म्हटलं की हे माझं घर आहे आणि मला पाहिजे ते मी करेल. याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. यात आईने मुलीचे केस धरून तिला ओढलं आणि तिच्या चेहऱ्यावर वार केला. यानंतर तिच्या मुलीनं हे घर सोडलं. कोर्टात आपली बाजू मांडताना महिलेनं म्हटलं की तिच्या मुलीला फार राग येतो. ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना तिच्या मुलीने मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. याच कारणामुळे तिचे केस धरून ओढले असता ती फरशीवर पडली. मात्र कोर्टाला ती मोबाईल फोन रेकॉर्डिंग आढळली ज्यात ही महिला आपल्या मुलीला घराबाहेर काढत होती. यानंतर कोर्टाने तिला 50 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.