मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आईसाठी म्हातारपणाची काठी होण्याऐवजी तिचाच छळ; 66 वर्षीय मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने सुनावली मोठी शिक्षा

आईसाठी म्हातारपणाची काठी होण्याऐवजी तिचाच छळ; 66 वर्षीय मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने सुनावली मोठी शिक्षा

आपल्याला एकच मुलगा असला तरी त्यानं घर सोडून अन्यत्र राहावं अशी मागणी आईनं केली आहे. आपला मुलगा आपला प्रचंड छळ करत असल्याची तक्रार (Mothers Complaint Harassment Against Son) या आईनं न्यायमूर्ती जाधव यांच्याकडे केली आहे

आपल्याला एकच मुलगा असला तरी त्यानं घर सोडून अन्यत्र राहावं अशी मागणी आईनं केली आहे. आपला मुलगा आपला प्रचंड छळ करत असल्याची तक्रार (Mothers Complaint Harassment Against Son) या आईनं न्यायमूर्ती जाधव यांच्याकडे केली आहे

आपल्याला एकच मुलगा असला तरी त्यानं घर सोडून अन्यत्र राहावं अशी मागणी आईनं केली आहे. आपला मुलगा आपला प्रचंड छळ करत असल्याची तक्रार (Mothers Complaint Harassment Against Son) या आईनं न्यायमूर्ती जाधव यांच्याकडे केली आहे

    मुंबई 26 मे : आई म्हणजे आपलं दैवत असते. आईच्या म्हातारपणी तिची शक्य तेवढी सेवा करता यावी, तिला कोणताही त्रास होऊ नये यासाठी अनेकजण तिला आपल्याजवळच ठेवून घेतात. त्यात मुलगा हा तर म्हातारपणाची काठी समजली जाते; पण काहीजण मात्र म्हातारपणी आईचा आधार होण्याऐवजी त्यांच्यावर भार होतात. अशाच एका 66 वर्षांच्या मुलाविरोधात त्याच्या 84 वर्षांच्या आईला कोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागलेत.

    या मुलाला आईचा फ्लॅट रिकामा करण्याचे आदेश अंधेरी पश्चिमच्या न्यायाधिकरणानं (Andheri West Tribunal) दिले होते. त्या आदेशावर स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) या 66 वर्षांच्या मुलाला वेळ दिला आहे. पण त्याचबरोबर जर तो प्लॅट रिकामा करू शकला नाही तर पोलीस आणि कलेक्टर त्याला घरातून बाहेर काढतील असे निर्देशही दिले आहेत. (Mother versus Son Case)

    “या प्रकरणातील याचिकाकर्ता आणि प्रतिवादी हे दोघेही खरंतर ज्येष्ठ नागरिक आहेत. पण न्यायधिकरणाने आईच्या बाजूने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, “ असं न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. हा मुलगा त्याच्या आईला त्रास देतो, हा आरोप या मुलाच्या वकीलांनी फेटाळला आहे. उलट तोही एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि त्याला राहण्यासाठी अन्य कोणतीही जागा नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला होता. त्यावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी हे निर्देश दिले.

    Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स रद्द

    जुहू पोलिसांनी (Juhu Police) पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा, 2007 च्या (Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007) न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार या मुलाला 16 जुलै 2021 रोजी घर रिकामं करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात मुलगा सुट्टीकालीन न्यायालयात गेला होता. त्याचा शहर दिवाणी न्यायालयातील दावा आणि उच्च न्यायालयातील याचिका अजूनही प्रलंबित आहेत. या मुलाला हा फ्लॅट 15 दिवसांत रिकामा करण्याचे आदेश जुलै 2021मध्ये देण्यात आले होते; पण तसे झाले नाही. त्या आदेशाची अंमलवजाबणी करण्यासाठी या 84 वर्षांच्या वृध्द महिलेला जुहू पोलीस स्टेशमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

    13 मे रोजी ही महिला न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर तिच्या चारपैकी दोन मुलींसह हजर राहिली होती. या दोन्ही मुली अविवाहित आहेत आणि त्याही 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. या दोघी मुली त्यांच्या आईसोबतच राहतात आणि आईची काळजी घेतात अशी माहिती आहे. न्यायाधिकारणाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणं हे तिच्यासाठी अत्यंत वाईट आहे. त्यामुळे तिला खूप त्रास होत आहे, अशी अत्यंत भावनिक याचिका महिलेनं केली होती.

    आपल्याला एकच मुलगा असला तरी त्यानं घर सोडून अन्यत्र राहावं अशी मागणी आईनं केली आहे. आपला मुलगा आपला प्रचंड छळ करत असल्याची तक्रार ( Mothers Complaint Harassment Against Son) या आईनं न्यायमूर्ती जाधव यांच्याकडे केली आहे. या महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर 2016 मध्ये हा फ्लॅट या महिलेच्या नावावर झाला. संबंधित फ्लॅटच्या पुनर्विकासाचे अधिकार पणाला लागले आहेत. आई आणि तिच्या मुलींनी मुलाच्या छळाविरोधात पोलीस तक्रारीही केल्या आहेत.

    प्रेमात नवरा ठरला अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीच्या छातीत खुपसला चाकू, मुंबईतील घटना

    या याचिकेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जानेवारी 2022 मध्ये दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन त्वरित निर्णय घ्यावा लागेल असं न्यायमूर्ती जाधव यांनी म्हटलं आहे.

    “या याचिकाकर्त्याला या कालावधीत (म्हणजे स्थगितीच्या कालावधीत) या फ्लॅटमध्ये राहण्याचा अधिकार आहे असा याचा अर्थ होत नाही,” असेही त्यांनी सांगितले. जर मुलगा उच्च न्यायालय किंवा शहर दिवाणी न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवू शकला नाही तर मात्र न्यायाधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असेही न्यायमूर्तींनी सांगितलं. या याचिकेवर सुनावणी व्हावी यासाठी नियमित कोर्टात (Regular Court) जाण्यासाठी या मुलाला 8 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

    या महिलेच्या घरी आठवड्यातून दोनदा भेट देऊन तिथे सर्वकाही व्यवस्थित आहे ना हे पाहण्यासाठी जुहू पोलिसांनी महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कॉन्स्टॅबलची नियुक्ती करावी असे आदेश न्यायमूर्ती जाधव यांनी दिले आहेत. या महिलेचा मुलगा त्याच्या आईचा छळ करत नाही ना याची खात्री करून घेण्याची जबाबदारीही या पोलीस अधिकाऱ्यांची असेल. 8 जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये जर हा मुलगा आईचा छळ करत असल्याचं आढळलं तर त्याला ताबडतोब त्या फ्लॅटमधून बाहेर काढण्यात यावं, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. एकूणच सख्ख्या आईचा छळ करणाऱ्या या मुलावर आता पोलिसांची नजर असणार आहे.

    First published:

    Tags: Mother, Mumbai high court