मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बलात्कार करण्याआधी महिलांना हे 3 पर्याय द्यायचा आरोपी, मग करायचा घृणास्पद कृत्य, अखेर अटक

बलात्कार करण्याआधी महिलांना हे 3 पर्याय द्यायचा आरोपी, मग करायचा घृणास्पद कृत्य, अखेर अटक

बलात्कार करण्याआधी आरोपी महिलांना तीन पर्याय (3 Options) देत असे. मात्र, अखेर तो करत तेच असे जे त्याला करायचं आहे.

बलात्कार करण्याआधी आरोपी महिलांना तीन पर्याय (3 Options) देत असे. मात्र, अखेर तो करत तेच असे जे त्याला करायचं आहे.

बलात्कार करण्याआधी आरोपी महिलांना तीन पर्याय (3 Options) देत असे. मात्र, अखेर तो करत तेच असे जे त्याला करायचं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

लंडन 08 ऑक्टोबर : ब्रिटनच्या एका न्यायालयानं (British Court) अनेक बलात्कार प्रकरणांमध्ये (Rape Case) दोषी आढळलेल्या एका व्यक्तीला 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बलात्कार करण्याआधी आरोपी महिलांना तीन पर्याय (3 Options) देत असे. मात्र, अखेर तो करत तेच असे जे त्याला करायचं आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जेव्हा पीडित महिलांनी (Rape Victims) आपली व्यथा मांडली तेव्हा तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले.

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, नागपुरातील घटनेने खळबळ

डेली स्टारच्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या मिडिल्सब्रा येथील रहिवासी डेनियल यूल याला 14 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानं अनेक महिलांवर बलात्कार केला. बलात्कार करण्याआधी तो महिलांना वेगवेगळ्या पद्धतींनं छळत असे. तो महिलांसमोर तीन पर्याय ठेवत असे. तो महिलांना म्हणत असे, की त्या रिंग, हॅमर किंवा चाकू यातलं काहीतरी एक निवडू शकतात.

पोलिसांनी कोर्टात सांगितलं, की डेनियल यूल या महिलांना म्हणत असे की रिंगचा पर्याय निवडून शांततेत मला शारीरिक संबंध ठेवू द्या, अन्यथा चाकू आणि हातोड्यानं मरण्यासाठी तयार राहा. महिलांनी कोणताही पर्याय निवडला तरीही तो बलात्कार करत असे. एका पीडित महिलेनं सांगितलं, की तिनं मृत्यूचा पर्याय निवडला होता. मात्र, आरोपीनं असं म्हणत तिच्यावर बलात्कार केला, की यात मजा येईल.

ऐतिहासिक! बलात्कारप्रकरणी कोर्टाने दिला फक्त 5 दिवसांत निकाल

दुसऱ्या एका घटनेत आरोपी डेनियल यानं पीडितेच्या चेहऱ्यावर मारत तिला जखमी केलं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. आणखी एका पीडितेनं सांगितलं, की बलात्कार करण्याआधी यूलनं तिला धमकी दिली, की कोणत्याही प्रकारचा विरोध करू नको. अन्यथा परिणाम गंभीर होतील. आरोपी महिलांना असंही म्हणत असे की त्यांच्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे त्यांनी शांत राहाणंच योग्य आहे.

First published:

Tags: Rape case, Rape news