Birthday साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलं होतं Couple; सायंकाळी धक्कादायक अवस्थेत सापडले

Birthday साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आलं होतं Couple; सायंकाळी धक्कादायक अवस्थेत सापडले

सहा महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झालं होतं, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला

  • Share this:

भठिंडा, 12 जानेवारी : लग्नाच्या सहा महिन्यांनंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यासोबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भठिंडा येथील एका खासगी हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, त्यांच्या हॉटेलमध्ये एक दाम्पत्य आलं होतं. (Couple had come to the hotel to celebrate his birthday) आणि वाढदिवस साजरा करण्याचं सांगून एक रुम भाड्याने घेतला होता.

याशिवाय आणखी गेस्ट येणार असल्याचेही त्याने सांगितले. मात्र संध्याकाळ झाली तरी कोणीच आलं नाही. शेवटची त्यांच्या खोलीत जाऊन पाहिलं तर धक्काच बसला, असं येथील एका कर्मचाऱ्याने सांगितलं. संध्याकाळी जेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहिलं तर तरुणाचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत होता. प्राथमिक पातळीवर त्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत होते.  यादरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळावर पोहोचलेले एस.एच.ओ दविंदर सिंह यांनी सांगितलं की, जे दाम्पत्य आलं होतं ते पती-पत्नी होते. आणि साधारण 6 महिन्यांपूर्वी ते विवाहबद्ध झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार घरात सुरू असलेल्या वादातून तरुणाने आत्महत्येसारखं पाऊल उचललं होतं. (Couple had come to the hotel to celebrate his birthday)

हे ही वाचा-VIDEO : पाण्यात उडी मारुन ब्लॅक पँथरचा एनाकाॅन्डावर Attack; जबड्यात पकडून खेचलं

त्यांनी सांगितलं की, तरुणाचं नाव पवन कुमार असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (Man suicide) या प्रकरणात त्याच्या पत्नीबाबत अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: January 12, 2021, 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading