नवी दिल्ली, 01 मे: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगाने वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशात एकूण 4 लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्ण (Corona patients in India) आढळले आहेत. याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. परिणामी ऑक्सिजनसह इतर वैद्यकिय सुविधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना ओढाताण करावी लागत आहे. अशातच काहीजण रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून त्यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन्स (Remdesivir injection black market) चढ्या दराने विकत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खाजगी रुग्णालयातील एका नर्सला आणि तिच्या दोन साथीदारांना (police arrest nurse with 2 others) अटक केली आहे. संबंधित आरोपी रेमडेसिवीरचं एक इंजेक्शन तब्बल 35 हजार रुपयांना विकत होते.
पोलिसांनी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात काम करणार्या 25 वर्षीय नर्ससह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. संबंधित 31 वर्षी आरोपीचं नाव नवीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत नजफगड येथून एक व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दराने विकत होता. पोलिसांनी आरोपींकडून सहा इंजेक्शन्स जप्त केले आहेत. संबंधित आरोपी एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न करीत होते.
यापूर्वीही दिल्ली पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना अटक केली आहे. पण या रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या लोकांना चाप बसवता आला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही औषधं परवडतही नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचा हकनाक बळी जात आहे.
हे ही वाचा-कोरोना काळात लूट! रुग्णालयानं एका दिवसासाठी उकळले 3.7 लाख रुपये, रुग्णाचा मृत्यू
अलीकडेच, दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत उत्तराखंडच्या कोटद्वार येथून 5 जणांना अटक केली होती. या आरोपींनी मोठ्या प्रमाणात बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स तयार केले होते. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींकडून रेमडेसिवीरची 196 बनावट इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. तर संबंधित आरोपींनी यापूर्वी सुमारे दोन हजार पेक्षा अधिक बनावट इंजेक्शन्स विकली आहेत. त्यांनी हे बनावट इंजेक्शन प्रति 25000 रुपयांना विकलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Delhi