लॉकडाऊनमध्ये धक्कादायक प्रकार, 14 वर्षाच्या मुलीने सांगितलं 'पप्पांनी आईला मारून टाकलं'

लॉकडाऊनमध्ये धक्कादायक प्रकार, 14 वर्षाच्या मुलीने सांगितलं 'पप्पांनी आईला मारून टाकलं'

पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

  • Share this:

हरियाणा, 05 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये हत्या आणि आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. गुरुग्रामच्या गढी हरसरू गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती. या संशयामुळे दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने सिटबेल्टने पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर पतीने सुसाईट नोट लिहून आत्महत्या केली. या घटनेपूर्वी आरोपी पतीने आपल्या 14 वर्षाच्या मुलीला दुसर्‍या खोलीत बंद केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी सायंकाळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला. शुक्रवारी संध्याकाळी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची पथक गढी हरसरू गावात पोहोचली. मृत जोडप्याच्या 14 वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितले की वडील प्रमोद कुमार (वय 32) मूळचे चित्तौडगड, राजस्थान येथील रहिवासी आहेत. ते पेशाने इलेक्ट्रिशियन होते.

हे वाचा - Breaking : राज्यात सापडले आणखी 26 कोरोना रुग्ण, एकूण आकडा 661 वर

14 वर्षीय मुलीच्या मते, गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने तिचे वडील घरी होते. मुलगी म्हणाली की तिचे वडील आईच्या चारित्र्यावर शंका घेत असत. या प्रकरणावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे. मुलीने सांगितले की, 'शुक्रवारी दुपारी आई आणि वडिलांमध्ये भांडण झाले. वडिलांनी मला खोलीत बंद केले व बाहेरून कुलूप लावले. यानंतर आईच्या डोक्याला बाहेर पडलेल्या सिटबेल्टने जोरदार जखम केली आणि ती जखमी अवस्थेत खाली पडली. यानंतर वडिलांनी बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या केली.

हे वाचा - 'माझ्या गाडीचा आवाज ऐकताच छकुली रडायला लागते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही'

सुसाइड नोट जप्त

स्टेशन प्रभारी संजय कुमार यांनी सांगितले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचवेळी आरोपी आरोपी पतीच्या खिशातून पोलिसांकडून एक सुसाइड नोट जप्त करण्यात आली असून, यात त्याने आपल्या पत्नीबरोबर भांडण असल्याचे लिहिले आहे. यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी मुलीच्या वक्तव्याच्या आधारे मृत पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्याचवेळी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हे वाचा - कुठे दारू मिळतेय का पाहण्यासाठी रात्रीचा निघाला बाहेर, नंतर...

First published: April 5, 2020, 1:02 PM IST

ताज्या बातम्या